स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा : शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके

0
449

स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा : शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके

शिवसेना गडचिरोली वतीने पोलीस अधीक्षकांना मागणीचे निवेदन सादर

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली शहरात मागील वर्षभरात अनेक ठिकाणी घरफोडी, हत्या, रस्त्यावरील बिघडलेल्या वाहतुकीने झालेले अपघात यामुळे पोलिस यंत्रणेवर जास्तीचा ताण पडत असल्यामुळे पोलिस ठाण्यात नवीन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरातील इंदिरा गांधी चौकात अनेक दिवसापासून सिग्नल बंद असलेले असून ते दुरुस्त करण्यात यावे. या ठिकाणी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता ताबडतोब पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे, युवासेना उपाध्यक्ष सागर भांडेकर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात दिलेल्या निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here