चेककोसंबी नं १ ची जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करा – पँथर रुपेश निमसरकार

0
642

चेककोसंबी नं १ ची जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करा – पँथर रुपेश निमसरकार

◆ संतापलेल्या गावकऱ्यांची भेट घेऊन दिला आंदोलनाचा इशारा

पोंभुर्णा : तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेक कोसंबी गावात वर्ग १ ते ४ पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र ही शाळा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे येथील चिमुकले विद्यार्थी गावात शाळा असूनही तिन किलोमीटर अंतरावर थेरगाव येथे दप्तराचे ओझे घेऊन सध्या सुरु असलेल्या वाघाच्या दहशतीत शिक्षणासाठी पायपीट करीत आहेत. ही गंभीर बाब बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील स्वयंघोषित लोकप्रिय असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रात घडते आहे. असा घणाघात करीत चेककोसंबी नं १ येथील गावकऱ्यांची भेट घेत त्यांचा संताप लक्षात घेऊन येथील बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी केली असून आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

पोंभुर्णा तालुका हा मागास व आदिवासी बहुल क्षेत्र आहे. या भागात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. येथील शैक्षणिक यंत्रणा शिक्षणाची धोरणे प्रभावी पणे राबविण्यात फेल ठरत असून लोकप्रतिनिधीही कुचकामी ठरत आहेत. शासनाची अनेक शैक्षणिक धोरणे आहेत. असे असतानाही चेककोसंबी नं १ मधील विद्यार्थ्यांना गावात जिल्हा परिषद शाळा असून सुद्धा बाहेरगावी जावे लागते ही बाब सुद्धा शासनाच्या शैक्षणिक धोरणाला काळीमा फासणारी आहे. या चेककोसंबी नं १ गावात मोठ्या प्रमाणावर बौध्दांची लोकसंख्या आहे. यात अनेक विद्यार्थीही बौद्धांची आहेत. त्यामुळे येथील बौद्धांची मुले शिकली नाही पाहिजे याकरिता इथले शासन व प्रशासन काम करतांना दिसते आहे. इथल्या प्रशासनाने ही जातीय द्वेशभावनेतून तात्काळ बाहेर येऊन बंद पाडण्यात आलेली शाळा तात्काळ सुरु करावी आणि बाहेरगावी शिकत असलेल्या मुलांना परत याच शाळेत पाठविण्यासाठी मदत करावी अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने चेककोसंबी नं १ च्या गावकऱ्यांचा व विद्यार्थ्यांचा आक्रोश पंचायत समिती कार्यालयावर धडकल्या शिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, बालाजी मेश्राम, सुमीत धोडरे, निशाल मेश्राम, मंगल लाकडे व गावकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here