मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन व जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षण विभाग) द्वारा “प्रशिक्षित शिक्षक सत्कार” समारंभाचे आयोजन

0
397

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन व जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षण विभाग) द्वारा “प्रशिक्षित शिक्षक सत्कार” समारंभाचे आयोजन

गडचांदूर :– वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृह,जिवती येथे मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षण विभाग)द्वारा प्रशिक्षित शिक्षकांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले.

यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ऐकून नऊ तालुक्यामध्ये मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे खेळातून जीवनकौशल्ये या उपक्रमाच्या यशश्वितेविसयीचे सविस्तर मनोगत या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व उपस्थित सत्कारमूर्ति शिक्षकवृंद यांनी व्यक्त केले.यामध्ये शिक्षकांना मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे दिल्या गेलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक घेत असलेले जीवन कौसल्याच्या सत्रा वीसयी शिक्षकांनी भरभरून मनोगत व्यक्त केले.या सत्राच्या माध्यमातून विध्यर्थ्यांमध्ये रूजवायची पाच जीवनकौशल्ये(संवाद कौशल्ये,गटकार्य कौशल्ये,शिकण्यातून शिकन्याचे कौशल्ये,स्व-व्यवस्थापनाचे कौशल्ये,समस्या सोडविन्याचे कौशल्ये) यावर शुद्धा मनोगत व्यक्त करण्यात आले.तसेच मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे विध्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदलसाठी “वर्तणूक बदल प्रणाली”,विध्यार्थ्यांना त्यांची हक्काची जागा म्हणजे त्यांचा “अभ्यास कोपरा”,पालकांना पाल्याच्या शिक्षनाविसयी प्रवृत्त करण्यासाठी “पालकसत्र”,”भागधारकांच्या भेटी व सभा” यामुळे विध्यार्थ्यांच्या शौक्षणिक प्रवाहात होणारा सकारात्मक बदल याविषयीचे मनोगत कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

शिक्षक सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रामा पवार (केंद्रप्रमुख पाटण),प्रमुख अतिथि म्हणून किसन बाउने (केंद्रे प्रमुख टेकामाडवा) संग्राम केंद्रे ( केंद्रे प्रमुख शेणगाव) अंकुश राठोड (विषय त ), ऋषिराज निमकर, विनय टिकले, सुधीर खोब्रागडे, अरुणा कवटे हे उपस्थित होते.

तसेच सत्कारमूर्ती म्हणून प.स.जिवती अंतर्गत ऐकून 37 शाळांमधील 48 शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्मृति चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व प्रशिक्षित शिक्षकांचा स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची धुरा बल्लारपूर तालुका समन्वयक नितेश मालेकर यांनी सांभाळली,कार्यक्रमा मध्ये गोविंद दुबळे(शाळा सहायक अधिकारी) खोब्रागडे(. शाळा सहायक अधिकारी), समुदाय समन्वयक ताई चौहान,नितेश डगे, सत्यशिला चौहान,सूरज तोगरे,नागेश खाडेकर यांच्या अथक परिश्रमाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here