मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने पुलवामा वीरांना श्रद्धांजली,व मॅजिक बस चा स्थापना दिवस संपन्न

0
609

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपुर च्या वतीने पुलवामा वीरांना श्रद्धांजली,व मॅजिक बस चा स्थापना दिवस संपन्न

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चंद्रपूर, जिल्ह्यातील निवळक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बस च्या माध्यमातून 12 ते 16 वयोगटातील विद्यार्त्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम स्केल (SCALE) कार्यक्रमा अंतर्गत बल्लारपुर तालुक्यातील 2554 विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.

मॅजिक बस इंडिया फौंडेशन चा आज स्थापना दिवस बल्लारपूर मधील 15 शाळेत साजरा करण्यात आला.
आज दि 4 फेब्रुवारी 2021 सामाजिक बांधिलकी बाळगता बल्लारपूर मधील एकूण 15 शाळेत पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला
सदर कार्यक्रमात मॅजिक बस चे समुदाय संघटक, शालेय विद्यार्थी, शालेय शिक्षक या सर्वांनी कार्यक्रमात उस्थिती दर्शविली व मॅजिक बस स्थापना दिवस त्याच सोबत पुलवामा मधील वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
व स्वच्छताचे महत्व सांगून हातधुणे कार्यक्रम , रांगोळी स्पर्धा, अश्या विवीध स्पर्धा घेऊन आजचा मॅजिक बस स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर दुसरीकडे पुलवामा मधील शाहिद वीर जवानांना कॅडेल प्रज्वलित करून त्यांना मान वंदना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here