गोंडपिपरीतील कुलथा घाटावर रेती माफियांचा तांडव

0
542

गोंडपिपरीतील कुलथा घाटावर रेती माफियांचा तांडव

माध्यमक्षेत्रातील प्रतिनिधिंचा समावेश

गोंडपिपरी/प्रतिनिधी : तालुक्यातील कुलथा व अंधारी नदी घाटावर रेती माफियांचा धुमाकूळ मागील महिनाभरापासून सुरू होता.ऐन लाकडाऊंच्या काळात सुरू असलेल्या या प्रकार चा प्रसिद्धी माध्यमाद्वारे वीस दिवसापासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र यादरम्यान तालुका प्रशासनाने कुठलीच कार्यवाही न करता माफियांना खुली सूट दिल्याचा प्रकार दिसून आला त्याचवेळी उशिरा का होईना येथील तहसीलदाराने कूलता घाटावर धाड टाकून तेथून चार तर गोंडपिपरी शिवाजी चौकात एक अशा पाच ट्रॅक्टर जप्त करून गोंडपिपरी पोलीस ठाण्यात जमा केले.
लाकडाउनच्या काळात संचार बंदी व जमावबंदी लागू असतानाही गोंडपिपरी तालुक्यात रेती माफिया कडून कहर सुरू होता याबाबत प्रसिद्धी माध्यमाने ने वारंवार पाठपुरावा करून देखील कुठल्याच प्रकारे कार्यवाही होताना दिसली नाही दरम्यान रेती माफिया याकडे नदीकाठावर मालाच्या साठवणुकीसाठी स्थानिकांच्या ट्रॅक्टर लावल्या होत्या. या ट्रॅक्टर द्वारा रात्रभर नदीपात्रातून मालाची डम्पिंग सुरू होती.सदर प्रकार सुरू असताना याची गोपनीय माहिती गोंडपिपरी चे तहसीलदार के.डी. मेश्राम यांना मिळाली माहितीच्या आधारावर त्यांनी आपल्यासह पोलीस पथक घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी स्थानिक कुलथा गावातील पोलीस पाटील व सरपंच यांच्या मदतीने त्यांनी कुलथा गावाजवळ रेतीने भरलेल्या चार ट्रॅक्टर जप्त केल्या. त्याच वेळी गोंडपिपरी येथील शिवाजी चौकात रेती वाहतूक करणाऱ्या पुन्हा एका ट्रॅक्टरला पकडले एकूण या पाचही ट्रॅक्टर वर कार्यवाही करून सदर ट्रॅक्टर गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आल्या.गुरुवारच्या पहाटेच्या कार्यवाही नंतर शुक्रवारी महसूल विभागाचा अहवाल पोलिसांना सादर करण्यात आला. तसेच महसूल विभागाच्या प्राप्त माहितीनुसार सदर ट्रॅक्टर नितेश डोंगरे, संतोष बंडावार, सचिन चौधरी, सुजाता चुनारकर व मनोज मेडपल्लीवार या नामनिर्देशीत वाहनमालकाचे असून, गोंडपिपरी पोलिसांकडून सदर प्रकरणी तपास सुरू आहे. आणि पुढील कार्यवाही गोंडपिपरी पोलीस प्रशासनामार्फत केली जाणार आहे.

ट्रॅक्टर मालक-चालकाचे काम कुणासाठी ? – कुलता घाटातून रेतीचा उपसा करून त्याची वाहतूक करण्यात आले. यादरम्यान तहसीलदाराने चार ट्रॅक्टर पकडल्या. आता पोलीस व महसूल प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यादरम्यान सदर ट्रॅक्टर चालक व मालकांचा बयान नोंदवून कुलता नदीघाटावर कुणासाठी त्यांचे काम सुरू राहिले याचे चाचपणी होण्याची गरज आहे यातून रिती व्यवसायातील मोठा मासा गडाला  लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here