लालगुडा येथे डिजे च्या तालावर रिसेप्शन सोहळा ; पोलीस पाटील, सरपंच कोमात

0
590

लालगुडा येथे डिजे च्या तालावर रिसेप्शन सोहळा ; पोलीस पाटील, सरपंच कोमात

वणी/प्रतिनिधी : शहरालगत लालगुडा येथे 21 मे 2021 च्या रात्री डिजे जोमात वाजल्याने पोलीस पाटील व सरपंच हे किती बेजबाबदार आहे. हे स्पष्ट दिसत आहे. सरकार म्हणते गर्दी नको, लग्न 25 लोकांमध्ये करा तसे आदेश सुद्धा काढण्यात आले. मात्र नागरिक त्या नियमांची पायमल्ली कशी करतात याचे जिवंत उदाहरण लालगुडा येथे दिसुन आले आहे.
जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना लालगुडा येथे अहिल्याबाई होळकर सभागृहा जवळ असलेल्या घरी लग्नाचे रिसेप्शन देण्यात आले होते. तेथे DJ सुध्दा लावण्यात आला होता. सरकारचे स्पष्ट आदेश असतांना यांनी डिजे च्या तालावर थिरकले. मात्र तेथील पोलीस पाटील व सरपंच किती बेजवाबदर आहे, अस म्हणायला हरकत नाही. भव्य कार्यक्रम कसा संपन्न झाला. पोलीस पाटील यांनी पोलिसांना सूचना का दिली नाही तसेच गावचे सरपंच यांनी सुद्धा जबाबदार नागरिक म्हणून भूमिका घेतली का नाही असा प्रश्न उपस्थित होतो? लालगुडा येथे जर कोरोना वाढला, त्यात मृत्यू संख्या वाढली तर याला जवाबदार कोण राहणार? पोलीस पाटील व सरपंच गावातच राहत असताना त्यांच्या कानावर DJ चा आवाज कसा आला नाही तसेच लग्नाची परवानगी असताना रिसेप्शन ची परवानगी कशी देण्यात आली…? हे विशेष आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here