दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाची जटपुरा गेट येथे निदर्शने

0
93

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाची जटपुरा गेट येथे निदर्शने

80 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या राजकारण्यांना तुरुंगात पाठवण्याऐवजी मोदींजी मिठीत घेत आहे – सुनिल मुसळे

दिल्ली सरकारच्या बनावट मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. या अटकेनंतर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड असंतोष व्यक्त केला आहे.

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार आम आदमी पार्टीला दबावात आणत आहे. आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून षडयंत्र रचन्यात येत आहे. निवडणूक काळात भाजपाने आम आदमी पार्टीला त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, दिल्लीतल्या जनतेने आपवरच विश्वास दाखवला. याचा अर्थ दिल्लीच्या जनतेला केजरीवाल यांच नेतृत्व मान्य आहे. परंतु, तुम्ही (भाजपा) एका चांगल्या माणसाला खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकता, त्याचा लोकशाहीचा अधिकार हिरावता. येना-या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवण्यात मतदार मागे पुढे पाहणार नाही. या आंदोलनात आप चे वरीष्ठ नेते सुनिल
देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, भूमिपुत्र ब्रिगेड च्या डॉ अभिलाषा ताई गावतुरे, डॉ राकेश गावतूरे,CPM चे रमेशचंद्र दहीवळेसर ,अरुन भेलके सुरेश विधाते आप चे संगठन मंत्री योगेश मुर्हेकर,शंकर सरदार,महानगर अध्यक्ष योगेश गोखरे ,युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गडलेवार,सुरज शाह,जिल्हा सचिव राजकुमार नगराळे,बल्लारपूर अध्यक्ष रवी पुप्पलवार,महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ताई बावरे,महिला महानगर अध्यक्ष एड तब्स्सुम शेख,शहर संगठन मंत्री संतोष बोपचे,महानगर उपाध्यक्ष सुनील सदभेय्या, राजेश चेटगुलवार, महानगर कोषध्यक्ष पवन कुमार प्रसाद,महानगर शिक्षक आघाडी अध्यक्ष ऐकनाथ हांडेकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष महेंद्र धुमने,राहुल चाव्हण, प्रा किशोर दहेकर,दिपक बेरशेट्टीवार,सुमित हस्तक,महानगर सहसंघटणमंत्री नागसेन लभाने,महानगर व्यापारी आघाडी अध्यक्ष अलंकार सावळकर, संतोष दोरखंडे,अफजल अली, डॉ सलिम तुकडी,सुनिल भोयर, बबन कृष्णपल्लीवार, प्रशांत रामटेके, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here