नेरी पांढरवाणी रस्त्यावर दोन मोटारसायकल मध्ये अपघात

0
399
  1. नेरी पांढरवाणी रस्त्यावर दोन मोटारसायकल मध्ये अपघात

*एक गंभीर तर तीन किरकोळ जखमी

विकास खोब्रागडे

चांद्रपूर दि.२०- चिमुर पोलीस स्टेशन अंतर्गत नेरी पोलीस दुरक्षेत्र कार्यालयाचे हद्दीत नेरी पांढरवाणी रस्त्यावर दोन मोटारसायकल मध्ये अपघात झाल्याची घटना आज दि.२० डिसेंबर ला सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान घडली
पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीनुसार असे की मोजा पांढरवाणी येथे जांभुळे परिवारांकडे मुलीच्या साक्षगंधाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला सावरगाव येथील किसन श्रावण दडमल वय 40 वर्षे मुलगा साहिल किसन दडमल 6 वर्षे आणि पत्नी हे आपल्या दुचाकी हिरो होंडा cd 100 क्रमांक mh 28 d 1855 या वाहनाने कार्यक्रम आटोपून गावाकडे जात होते तर याच कार्यक्रमाला आंबोली येथील स्वनिल वाकडे वय २५ वर्षे हा आपल्या एम एच ३४ बि क्यु १०६२ या एक्सट्रीम या दुचाकी गाडीने आणि राष्ट्रपाल चौधरी वय 25 वर्षे हे दोघे नेरी वरुन जात होते पांढरवाणी जवळील वळणावर दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने जोरदार धडक झाली यात मुलगा साहिल दडमल गंभीर जखमी झाला असून त्याचे वडील किसन दडमल आणि आई किरकोळ जखमी झाले असून स्वप्नील वाकडे सुद्धा जखमी झाले आहेत या सर्वांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले असून पुडील तपास चिमूर पोलीस करित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here