लापलेठ येथील नागरिकांना त्रास देण्याचे काम वेकोली प्रशासनाने करु नये – आ. किशोर जोरगेवार

0
630

लापलेठ येथील नागरिकांना त्रास देण्याचे काम वेकोली प्रशासनाने करु नये – आ. किशोर जोरगेवार

लालपेठ येथील नागरिकांच्या समस्यांबाबत वेकोली अधिकारी यांची घेतली बैठक

 

 

 

लालपेठ येथील नागरिकांना वेकोली प्रशासनाकडून त्रास दिल्या जात आहे. येथील लाईट बंद करुन ठेवण्यात येत आहे. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. खदानीत होणा-या ब्लॉस्टींगमुळे येथील घरांच्या भितींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वेकोली प्रशासनातील वरिष्ठ अधिका-र्यांनी याकडे लक्ष देत येथील नागरिकांना त्रास देण्याचे काम थांबवावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केल्या आहे.

 

 

लालपेठ येथील विविध समस्यांना घेवुन आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकिय विश्राम गृहात वेकोलीच्या अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी अधिका-र्यांना सदर सुचना करण्यात आल्या आहे. या बैठकीला वेकोलीचे मुख्य प्रबंधक मोहम्मद साबीर, लालपेठ वेकोली क्षेत्र नियोजन अधिकारी, उपक्षेत्रिय मॅनेजर मनिष पांडे, लालपेठ एरिया पर्सनल मॅनेजर आर. के. सिन्हा, वेकोली प्लॅनिंग आॅफिसर संजय फितवे, सिव्हिल विभागाचे अभियंता एन.सी. ब्यापारी यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, देवा कुंटा, राम जंगम, जितेश कुळमेथे आदिंची उपस्थिती होती.

 

 

लालपेठ येथे वेकोलीच्या कार्यप्रणालीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत येथील नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांना तक्रार केली होती. त्यांनतर आमदार किशोर जोरगेवार यांनी काल सोमवारी लालपेठ येथे जाउन प्रत्यक्ष येथील परिस्थितीची पाहणी केली. यात येथील घरांना भेगा पडल्याचे दिसुन आले. सदर भेगा या येथील खाणीत होत असलेल्या ब्लॉस्टींगमुळे पडल्याचे येथील नागरिकांनी सांगीतले. त्यांनतर या सर्व विषयाच्या अनुषंगाने आज मंगळवारी शासकिय विश्रामगृह येथे वेकालीच्या अधिका-र्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी लालपेठ येथील विद्युत पूरवठा सकाळी ११ वाजता पासुन सुरु करण्यात यावा, लालपेठ कॉलरी परिसरातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, लालपेठ येथे धुळीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येथे दिवसातून दोन दा टॅंकरने पाण्याचा छिरकाव करण्यात यावा, खदानीत सुरु असलेल्या ब्लॉस्टींगमुळे घरांना भेगा पडत आहे. त्यामुळे ब्लॉस्टींगची तिव्रता कमी करण्यात यावी आदि सुचना या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केल्या आहे. येथील ३३१ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या नागरिकांना मोबदला देण्याकरीता पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. सोबतच तुकुम येथील स्मशानभुमीसाठी वेकोलीच्या जागेवर सामाजिक दाईत्व निधीतुन दोन शेडचे बांधकाम करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वेकोली प्रशासनाला केल्या आहे. या बैठकीला लालपेठ येथील नागरिकांचीही उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here