नांदा येथील गायत्री उरकुडे डीसी इंडिया स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात

0
421

नांदा येथील गायत्री उरकुडे डीसी इंडिया स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकात

उत्तराखंड देहरादून येथे दिमाखात पार पडली स्पर्धा

 

 

प्रवीण मेश्राम, कोरपना
नांदा येथील हल्ली मुक्काम दुध डेअरी स्थाई गायत्री सूर्यभान उरकुडे हिने मिस नागपुर डीसी इंडिया 2022 चा आपल्या नावाने केला आहे. 14 मी रोजी देहरादून उत्तराखंड या ठिकाणी पार पडलेल्या डीसी इंडिया 2022 प्रतियोगीतेमध्ये प्रथम पहिल्या पाच क्रमांकामध्ये गायत्रीची निवड झालेली असून सदर प्रतियोगीतेमध्ये देशातील विविध शहरातील एकूण 40 मीस सहभाग घेतला होता. ज्यामध्ये गायत्रीला मिस नागपुर डीसी इंडिया 2022 सबटायटल हा किताब प्राप्त झाला.

स्पर्धेचे आयोजन सेलिब्रिटी डिझायनर सोपी साबरी द्वारा केल्या गेले होते. झालेल्या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून हरियाणाचे अभिनेता कुलदीप कौशिक प्रामुख्याने उपस्थित होते. गायत्रीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील विद्यालयीन शिक्षक व प्रशिक्षकांना दिलेले आहे. तिच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here