उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी एम.डी मेडिसिन डॉक्टर त्वरित उपलब्ध करून द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

0
609

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील कोरोना बाधितांच्या उपचारासाठी एम.डी मेडिसिन डॉक्टर त्वरित उपलब्ध करून द्या – माजी आमदार प्रा.राजू तिमांडे

एम. डी मेडिसिन डॉक्टर हिंगणघाट रुग्णालयात उपलब्ध करून दिल्यास व्हेंटिलेटर होईल सुरू

हिंगणघाट,अनंता वायसे (१५ एप्रिल)
हिंगणघाट जिल्हा वर्धा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांचे उपचारासाठी एम.डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध करून देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोना बाधितांच्या उपचारार्थ ४५ बीडची व्यवस्था करण्यात आली असून ऑक्सिजनची सुद्धा व्यवस्था आहे.
ज्या कोरोना बाधितांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे एम.डी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे चार सेट सुरू होऊ शकते. परंतु फिजीशियन उपलब्ध नसल्यामुळे कोरोना बाधितांना सेवा घेता येत नाही आहे.
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. व्हेंटिलेशनच्या पेशंटसाठी वर्धा, नागपूर येथील सरकारी व प्रायवेट दवाखान्यात बेड उपलब्ध नाही. त्यामुळे करून बाधितांना व्हेंटिलेटरची सेवा देण्यात अडचण निर्माण झाली आहे.
तरी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोरोना बाधितांच्या उपचारासाठी एम.डी मेडिसिन डॉक्टर ( फिजिशियन) त्वरित देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार प्रा राजू तिमांडे यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली आहे.

“कोरोना बाधितांची संख्या दिवसेंन दिवस वाढत आहे. परंतु फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे एम.डी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध करून दिल्यास व्हेंटिलेटरचे चार सेट सुरू होऊल. अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांना केली आहे.”
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here