अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

0
535

अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गडचिरोली जिल्ह्यतील 1E अतिक्रमण मध्ये नोंद असलेल्या शेतकऱ्यांचे धान महामंडळ आणि. APMC मध्ये खरेदी करत नाही. अश्या प्रकारची तक्रार शेतकरी लोकांनी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाह यांच्याकडे केली असता सुरेश शाह यांनी ही बाब तात्काळ गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या लक्षात आणून दिली त्यावर आमदार साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या जवळ बैठक लावून ही बाब जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षात आणून देत आजपर्यंत 1E वर नोंद असलेल्या शेतकऱ्यांचे धान घेत होते पण यावर्षी धान घेणार नाही असे महामंडळ मनत असून यावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे नाहीतर खूप सारे शेतकऱ्यांचे नुकसान होईल यावर तात्काळ जिल्हाधिकारी साहेबांनी तहसीलदार यांना पत्र देऊन तलाठी यांना दाखला देण्यास सांगून लवकरात लवकर त्यांचे पण धान खरेदी करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे अश्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही हे मात्र स्पष्ट झाले…
यावेळी माननीय आमदार डॉ देवराव जी होळी, कृषी सभापती प्राध्यापक रमेश जी बारसगडे, भाजप बंगाली आघाडी चे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here