भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा हिंगणघाट ग्रामीण कडून सर्वधर्मीयांचे धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी आंदोलन

0
317

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विचित्र निर्णय घेऊन धार्मिक जनतेला वेठीस धरून तळीरामाची तहान भागविण्यासाठी दारूची दुकाने खुले करत राज्याची आध्यात्मिक, धार्मिक *सर्व धर्मियांचे प्रेरणास्थान असणारे मंदिर, मस्जिद, गुरूव्दारे, बौद्ध विहार, चर्च इत्यादी* बंद करून सरकारची दिशाहीन वाटचाल अधोरेखित झाली आहे. करीता जनतेची भावना जुळलेली सर्व धर्मियांचे धार्मिक स्थळे तातडीने उघडावी हि जनतेची मागणी घेऊन महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ विदर्भाची पंढरी संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे मंदिरासमोर मा. आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात भाजप तालुका अध्यक्ष आकाशभाऊ पोहाने यांच्या नेतृत्वात १३ ऑक्टोंबर २०२० ल‍ा महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करून महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदविण्यात आला या आंदोलनाला भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव आंबटकर, युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकूर , पं.स. सभापती शारदाताई आंबटकर किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गंगाधरराव कोल्हे ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विठू बेनिवार ,भाजपा सरचिटणीस तुषार ,विनोद विटाले,तुषार आंबटकर भाग्येश देशमुख,वडनेर ग्रा.प. सदस्य बंडू आंबटकर , युवा मोर्चा सरचिटणीस उमेश कोल्ले ,अजय पवार ,निखिल डुकरे, बुथ प्रमुख दिलीप तपासे ,वासुदेव रघाटाटे,महेश रेवतकर ,गजानन चरडे ,निखिल ऊताने ,सौरभ चव्हाण , निखिल काले इत्यादि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here