शिवभक्त गणेशोत्सव मंडळ देवळा येथे संपन्न झाले रक्तदान शिबिर

0
557

शिवभक्त गणेशोत्सव मंडळ देवळा येथे संपन्न झाले रक्तदान शिबिर

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील देवळा येथील शिवभक्त गणेश उत्सव मंडळ व लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीचे निमित्त साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात 26 युवकांनी रक्तदान केले असून. कोरोना काळात सध्या सगळीकडे रक्ताचा तुटवडा भासत आहे.

रक्ताची हि तूट भरून काढण्यासाठी सध्या वेगवेगळ्या संघटनांमार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. या सर्व गोष्टीचा आदर्श समोर ठेवून मारेगाव तालुक्यातील देवळा येथे युवकांनी गणेश उत्सवा निमित्त इतर कार्यक्रम वगळता रक्तदान शिबिराचे आयोजित करून सर्वांसमोर एक मोठा आदर्श निर्माण केला या रक्तदान शिबिराच्या यशस्वीते करिता लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर व शिवभक्त गणेश उत्सव मंडळ देवाळाचे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here