पावत्या / पार्सलची बिले केरकचऱ्यात टाकू नका -अॅड. चैतन्य भंडारी

0
547

पावत्या / पार्सलची बिले केरकचऱ्यात टाकू नका -अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: आपल्याला नको असलेली बिले, पावत्या, शॉपिंग, ऑनलाईन, किंवा दुकानांमधील – खरेदी केलेल्या वस्तुंवरील रिसीट / बिले व बँकेची विथड्रॉवल स्लिप सरळ केरकच-यात टाकली जातात किंवा कोठेही फेकली जातात, त्यावर तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता तसेच वैयक्तिक माहिती असते आणि त्या माहितीवरुन फसवणूक करणारी व्यक्ती तुमच्या नावाने नवीन पार्सल तयार करते. तुम्ही ते पार्सल स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर डिलिव्हरी रद्द करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर ओटीपी मागवला जातो. तुम्ही तो ओटीपी दिल्यास तुमचे बँक खाते हॅक होवू शकते, फसवणुकीचे असे प्रकार ऑनलाईन शॉपिंग करतांना मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तुमचा नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादी खाजगी माहिती असणारी बिले कच-यात टाकण्यापुर्वी त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी म्हणजे त्या बिलांचे तुकडे करावे किंवा सरळ जाळून टाकावे, जेणेकरुन तुमच्या वैयक्तिक माहितीचा कुणीही दुरुपयोग करणार नाही, गैरफायदा घेणार नाही म्हणून नागरीकांनी आपली वैयक्तिक माहिती असलेले व आपल्याला नंतर लागणार नाही किंवा त्यांचा आपल्याला त्यांचा नंतर काहीच उपयोग होणार नाही असे विविध प्रकारच्या पावत्या / बिले नष्ट करावीत, इतरत्र फेकू नये असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here