विसापूर येथे १५ जानेवारी ला जिल्हास्तरीय सब ज्युनियर अथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन
राजुरा – महाराष्ट्र अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर येथे होणार आहे. करिता 8,10 व 12 वर्षाआतील मुले व मुली यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड चाचणी चे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 15 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर तालुका बल्लारपूर च्या पटांगणात आयोजित केलेली आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना जन्माचा दाखला, आधारकार्ड व 2 पासपोर्ट छायाचित्र असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.