अखेर नालेसफाई ला मिळाला मुहूर्त!
पुन्हा एकदा इम्पाक्टचा इम्पाक्ट!!
इम्पाक्ट २४ न्युज च्या वुत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीने सूरु केली नाले सफाई
राजुरा (विरेन्द्र पुणेकर) बाबापूर/माणोली : १२ मार्च ला इम्पाक्ट २४ न्युज ने नाले सफाई या कडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष व नाले सफाईला मिडेना मुहूर्त असे वृत प्रकाशित केले होते.
त्याच वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतद्वारे २ एप्रिलला नाले सफाई चे काम सुरू करण्यात आले. अखेर नाले सफाईला ला मिळाला मुहुर्त असे नागरिकांच्या मुखी उच्चार दिसून येत आहे. नागरिकांच्या मनात एक खुशीची उमंग निर्माण झाली आहे. की आता गावातील नाले व परिसर रोग-राई व दुर्गंधमुक्त होईल. अशा प्रकारची लाट नागरिकांच्या मनी पसरली आहे.
याच सोबत नागरिकांनी इम्पाक्ट २४ न्युज चे आभार मानले आहे की, इम्पाक्ट २४ न्यूज द्वारे १२ मार्च रोजी नाले सफाई व सांड पाण्यामुळे होत असलेल्या अत्यंत त्रासाची समस्या निवारणासाठी जे वृत्त प्रकाशित करून ग्रामपंचायतच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याची दखल घेत गावातील सर्व नाले सफाई चे काम तातडीने घडून येत आहे.
