बल्लारपूर प्रोटीन कंपनीच्या कामगारांना अखेर मिळाला न्याय!
(प्रा.महेंद्र बेताल प्रतिनिधी बल्लारपूर) काल दि.30/10/2020 बल्लारपूर प्रोटीन कंपनी(हड्डी फ्याक्ट्री) तीन कामगार टाकी साफ करतांना बेशुद्ध झाले.त्यापैकी विशाल वसंता मावलीकर वय 36 वर्षे मु.दहेली यांचा जागीच म्रुत्यु झाला व दोन कामगारांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.ते सध्या धोक्याबाहेर आहेत.
परंतु बामनी येथील कंपनीच्या म्यानेजमेंटने कुठल्याही पत्रकारांना आत येऊ दिले नाही. गेटवर दहेली परिसरातील असंख्य नागरिक व कामगारांनी गर्दी करून म्रुतदेह कंपनी समोर आणून ठेवला.जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत म्रुतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर कंपनीच्या पदाधिका-यांना गावातील प्रतिनिधीशी व बल्लारपूर येथील सर्व क्षेत्रातील गणमाण्य व्यक्ती यांच्याशी जवळपास तीन तास चर्चा करून कंपनीच्या अधिकार्यांना धारेवर धरले. कंपनीच्या ढिसाळ धोरणामुळे एका कामगाराला जीव गमवावा लागला. तेव्हा कंपनीने कामगारांच्या घरच्या लोकांना परमनंट नौकरी व कंपणीकडून दहा लाख रुपयांची मदत तात्काळ देण्यात आली. यासाठी अनेक लोकांनी सहभाग घेतला. व बल्लारपूर येथील प्रतिष्ठित नागरिक राजू झोडे,हरिश शर्मा, सिक्की यादव,कमलेश शुक्ला,प्रा.महेंद्र बेताल,धिरज निरंजने दहेली येथील सरपंच, उपसरपंच व असंख्य गावकऱ्यांच्या प्रयत्नांनी कामगारांना न्याय मिळवून दिला.
यात बल्लारपूर पोलिस निरीक्षक मा.शिवलाल भगत साहेब यांनी आपल्या पद्धतीने म्यानेजमेंट व सर्व प्रतिनिधी यांच्यांशी समन्वय साधून पोलिसातील माणुसकीचा परिचय देऊन विशेष सहकार्य केले.
सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तथा बल्लारपूर पोलिस करीत आहेत.
