हाथरस प्रकरणातील “त्या” दाेषींना कठाेर शिक्षा द्या!यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडेची मागणी!

0
398

हाथरस प्रकरणातील “त्या” दाेषींना कठाेर शिक्षा द्या!यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडेची मागणी!

चंद्रपूर किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी

-उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील भूलगाडी गावात मनीषा नावाच्या एका तरुणीवर काही दिवसांपुर्वि सामुहिकरित्या बलात्कार करुन नंतर तीची अमानुषापणे हत्या करण्यांत आली हाेती.दरम्यान चंद्रपूरातील यंग चांदा ब्रिगेडच्या मुख्य शहर महिला संघटिका वंदना हातगावकर यांनी या घटनेचा जाहिररित्या निषेध नाेंदविला हाेता .दिवसागणिक अत्याचाराच्या घटना वाढत असुन समाजातील स्त्रीयांना सुरक्षा मिळणे अत्यंत गरजेचे असुन शासनाने कडक कायदे अमलात आणावे अशी त्यांनी मागणी केली हाेती .मनीषा प्रकरणात निपक्षपाती चाैकशी करुन जे काेणी या प्रकरणांत दाेषी असेल त्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यांची मागणी नुकतीच चंद्रपूरातील सामाजिक यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे ने केली आहे .ग्रामीण भागा साेबतच शहरातील महिलां सुरक्षेच्या द्रूष्टीकाेणातुन शासनाने तरुणी साठी एकादे (ज्यूडाे कराटे सारखे)प्रशिक्षण केन्द्र सुरु करावे . ही सुध्दा मागणी भाग्यश्री हांडेने केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here