अल्ट्राटेक फाऊंडेशन द्वारा ६० संगणकांचे वितरण

0
541

अल्ट्राटेक फाऊंडेशन द्वारा ६० संगणकांचे वितरण

आवाळपूर :- जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा शिक्षणाचा स्तर वाढावा व आजच्या युगात आवश्यक असणाऱ्या संगणकाचे ज्ञान असावे यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवून त्यांची पटसंख्या वाढवण्याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाऊंडेशन, आवारपूर द्वारा आवारपूर, बिबी, नांदा, पालगांव, नोकारी, राजुरगुडा, कोल्हापूरगुडा, तळोधी, बाखर्डी, भोयगांव, हिरापूर व सांगोळा अशा १२ गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा तर जिल्हा परिषद तेलगु शाळा नांदा, जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी अशा एकूण १५ शाळेना एकूण ६० संगणक यंत्र वरिल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला मा. संजय शर्मा, बी. पी. सग्गु, योगेश भट, देवांशू सिंन्हा व कर्नल दिपक डे हे उपस्थित होते.

प्रामुख्याने संगणकाचा स्वीकार करण्याकरिता सर्व गावांतील गावातील प्रमुख सिंधुताई परचाके आवारपूर, अल्का पायपरे बाखर्डी, दशरथ नागतुरे नोकरी, प्रमोद कोडापे हिरापूर, सचिन बोंढे सांगोडा, आशिष देरकर बीबी, गणेश पेंदोर नांदा, पुरुषोत्तम आस्वले नांदा व शिक्षक वर्ग उपस्थित होते. व्ही. एम. पवार, एम के.उपरे, पि. एस. रत्नमाळ, बी. एम. मेश्राम, शरद लांडे, डि. एन. धवने, जे. बी. घोटकर, नितीन बुरांडे, सुभाष जाधव, रामु गावंडे, पदमला गाधारते, किशोर मेंढुले,अनील मुसळे, शोभा शेंडे.

या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना मा.श्री. संजय शर्मा यांनी आपल्या शाळेतील लहानपणापासूनच्या आठवणीला उजाळा दिला. व त्यांनी संगणकाचे महत्व सोप्या व सरळ भाषेत उदाहरणासह समजावून सांगितले. कर्नल दीपक डे यांनी गावांच्या व शाळेच्या विकास कामाला आम्ही नेहमी सज्ज राहु असे सांगितले.

या कार्यक्रमाचे संचालन श्री संजय पेठकर यांनी सी. एस. आर. च्या विकास कामाचा आढावा सांगत केले तर आभार प्रदर्शन सचिन गोवारदीपे यांनी केले.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता आय. टी. विभाग हेमंत होमकर व सी. एस. आर. विभाग संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here