वंचित बहुजन आघाडी ची समीक्षा बैठक संपन्न

0
428

*वंचित बहुजन आघाडी ची समीक्षा बैठक संपन्न*

विकास खोब्रागडे

वंचित बहुजन आघाडी चिमुरच्या वतीने ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना मध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि नगरपरिषद चिमूर व ग्रामपंचायत निवडणूक यासंदर्भात मिटींगचे आयोजन केले होते. याकरिता मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रमेश कुमार गजभे ,(समन्वयक पूर्व विदर्भ )अरविंद संदेकर,जयदीप खोब्रागडे,( जिल्हा महासचिव) कविता गौरकार महिला जिल्हाध्यक्ष, शितल पारधी महिला जिल्हा महासचिव, लहू पाटील निळकंठ शिंदे आदी उपस्थित होते. यांच्या वतीने संघटन मजबूत करण्यासंदर्भात आणि आपापसातील सर्व मतभेद दूर करून वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे व त्यांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. तसेच चिमुर नगरपरिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीनिशी सर्व उमेदवार लढविणार आहे इच्छुक उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडी कडे रीतसर उमेदवारी अर्ज सादर करावा याकरिता समन्वयक म्हणून शालिक थुल यांची नियुक्ती पूर्व विदर्भ समन्वयक डॉक्टर रमेश कुमार गजबे यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे संचालन व आभार ज्ञानेश्वर नागदेवते व प्रास्ताविक ज्ञानदिप खोब्रागडे ,यांनी केले या करिता राजू घोनमोडे,शालीक थुल, लालाजी मेश्राम सारंग दाभेकर, मधुकर गेडाम, मनोज राहुत,भाग्यवान नंदेश्वर ,रमेश गेडाम ,प्रवीण गजभिये, रुपेश वाघमारे, रोशनी ताई महिल अध्यक्षा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here