अंतरगाव बु. सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी संघटना भाजपा युतीचे 12 पैकी 12 उमेदवार विजयी

0
459

अंतरगाव बु. सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी संघटना भाजपा युतीचे 12 पैकी 12 उमेदवार विजयी

काँग्रेस चा दारुण पराभव

 

 

नांदाफाटा : अतिशय प्रतिष्ठेची असलेली अंतर्गत बु. सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत शेतकरी संघटना भाजप युतीचे 12 पैकी 12 ही उमेदवार विजय झाले असुन काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. विजयी उमेदवारांमध्ये सविता संतोष पिंपळकर, गंगुबाई मधुकर वाघाडे, सतीश पांडुरंग मोहितकर, लिंबाजी बालाजी देवकते, गणपत अंबादास काळे,श्रीराम तुकाराम कोइटे, दत्तात्रेय विठ्ठल डाहुले, शंकर राजेश्वर नरड, राजेंद्र नारायण पानघाटे,ज्ञानेश्वर जगन्नाथ बोबडे, हनुमान काशिनाथ शेलारकर, शेषराव पिसाराम शिलारकर हे उमेदवार विजयी झाले आहे. सदर निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना भाजप युतीच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. माजी आमदार ऍड. वामनराव चटप व ऍड. संजयराव धोटे यांच्या मार्गदर्शनात माजी उपसरपंच आशिष मुसळे, माजी सरपंच सचिन बोंडे,विशाल पावडे, उपसरपंच अरूण काळे, माजी सरपंच, प्रमोद कोडापे,मोहन देरकर आदिनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here