इम्पॅक्ट च्या वृत्ताची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने लावली नवीन पाण्याची टाकी

0
562

इम्पॅक्ट चा इम्पॅक्ट!

इम्पॅक्ट च्या वृत्ताची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने लावली नवीन पाण्याची टाकी

राजुरा, (७ एप्रिल) अमोल राऊत । चिकन मार्केट नाका नंबर ३ सोमनाथपूर वॉर्ड येथे असलेल्या पाणी पुरविणाऱ्या २००० लिटर सींटेक्सच्या पाण्याची टाकी एक महिन्यापासून फुटली होती. यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होऊन पाणी वाया जात होते. यामुळे ‘नगरपरिषद प्रशासनाला जाग केव्हा येणार’ या मथळ्याखाली इम्पक्ट ने वृत्त प्रकाशित करून हि बाब नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर वृत्ताची दखल घेत प्रशासनाकडून त्या टाकीची बदली करून त्याठिकाणी काल नवीन सिंटेक्स टाकी बसविण्यात आली.
नगर परिषद राजूऱ्याच्या अखत्यारीत असलेले चिकन मार्केट येथील गाडे भाडे तत्वावर दिले असून येथील पाण्याची व्यवस्था सुद्धा नगर प्रशासन यांच्या देखरेखी मध्ये असते. आता उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून रखरखते ऊन तापत आहे. यामुळे पाण्याच्या सुविधा महत्वपूर्ण आहे. याच ठिकाणी दुसरी सिंटेक्स टाकीसुद्धा फुटून पाणी झिरपत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे दुसरीही पाण्याची लवकर बडकवून नवीन टाकी लावण्यात यावी अशी मागणी चिकन मार्केट द्वारे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here