घुग्घुस येथील मुन्नूरूकापू समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे निःशुल्क चिकित्सा शिबिर

0
277

घुग्घुस येथील मुन्नूरूकापू समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे निःशुल्क चिकित्सा शिबिर

प्रत्येक आजाराचे निःशुल्क तपासनी करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन – शंकर सिद्दम

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील दि.२४ डिसेंबर २०२३ रविवार रोजी सकाळ रोज जिल्हापरिषद उच्च प्राथमिक मराठी व तेलगु शाळा येथे आयोजित करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जि.प. अध्यक्ष व माजी भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर मा.देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.

मुन्नुरकापू समाज प्रदेश उपाध्यक्ष शंकर सिद्दम व समाज बांधव यांच्या हस्ते मा.देवराव भोंगळे व भाजयूमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना श्राल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.

देवराव भोंगळे म्हणाले की मुन्नुरकापू समाजाची स्थापना झाली तेव्हापासून शंकर सिद्दम यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, आज निःशुल्क नागरिकांसाठी चिकित्स शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आरोग्य आपलं चांगले राहिले तर आयुष्य अगदी आरामात जगता येईल, कार्यक्रम छोटा असो वा मोठा, मुन्नुरकापू समाज, समाजाच्या स्थापनेपासून तुम्ही मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलावलं आहे आणि मी आलो आणि आम्ही तुमच्या सोबत सैदर्व मदतीसाठी आपल्या पाठीसी खंबीरपणे सोबत राहणार.

डाॅ.राकेश अंबाटी, डाॅ.रागिणी राव अंबाटी,डाॅ.भूषण आ.चौखे व डाॅ.प्रविण चौधरी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून मून्नूरुकापू समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे पदाधिकारी तसेच समाज बांधवानी केले.

आलेले परिसरातील नागरिकाची रक्तदाब, मधुमेह, डोळे, मोतीबिंदू, किडणी रोगनिदान निःशुल्क तपासणी करण्यात आले,तसेच वैद्यकीय सल्ला नागरिकांनी देण्यात आले.४५० नागरिकांनी निःशुल्क तपासणीचा लाभ घेण्यात आले.

यावेळी माजी महिला,बालकल्याण सभापती नितु चौधरी, माजी सरपंच संतोष नुने,माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सदस्य पुजा दुर्गम,माजी तंटामुक्त अध्यक्ष महेश बल्ला,समाज अध्यक्ष गोपाल तोटा, मोगली लक्काकुला, श्रीनिवास लक्काकुला,रामास्वामी पुप्पाला,दासरी तिरुपती, मेटा ओडेल लक्काकुला, रमेश,तोटा व्यंकटेश, रतन मेडा, ओदल मेडा, कोप्पुला लक्ष्मण, तोटा शंकर, वैद्य रायलिंगु, रॅगय्या पुरेली, पुरेल्ली राजम,रामु, लक्ष्मण, अजय, किरण, सुरेश, चंदन व भाजप कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here