प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटी लि. घुग्घुसचा ४ था वर्धापन दिन संपन्न

0
222

प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटी लि. घुग्घुसचा ४ था वर्धापन दिन संपन्न

आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम व्हावी यासाठीच संस्थेची स्थापना – किरण बोढे

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा ४ था वर्धापन दिन रविवार, २४ डिसेंबर रोजी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. घुग्घुसच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी जि. प. सदस्य चिन्नाजी नलभोगा, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुम सातपुते, भाजपाचे सुनील बाम, सुरेंद्र जोगी, अश्विनी टोंगे, डॉ. पुंडलिक भोंगळे संस्थेच्या उपाध्यक्षा निशाताई उरकुडे, प्रबंधक प्रीती गुल्हाने, प्रीती धोटे मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते आरडी खाते धारकांना भेटवस्तू देण्यात आली.

मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या अध्यक्षा किरण बोढे म्हणाल्या, आर्थिक दृष्टया महिला सक्षम व्हावी आणि समाजातील दुर्बल महिला घटकांना बचतीची सवय लागावी यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी बचत केल्याने आर्थिक अडचण दूर होणार, दिनांक २४/१२/२०१९ रोजी या संस्थेची स्थापन करण्यात आली. आतापर्यंत जवळपास ५ हजार संस्थेचे सदस्य आहे व १ हजार ३०० आरडी खाते धारक आहे. आरडी, दैनंदिन आरडी, महिन्याची आरडी काढण्यात येत असून गृह कर्ज, सोने तारण कर्ज दिले जाणार आहे. कर्ज बुडवणारे थकबाकीदार संस्थेत नाही त्यामुळे संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे.

संचालन सुनीता पाटील यांनी केले तर आभार निशा उरकुडे यांनी मानले. यावेळी मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here