वैनगंगा नदीत तेंदूपत्ता भरलेला ट्रक कोसळला, दोघांचा मृत्यू..

0
500

वैनगंगा नदीत तेंदूपत्ता भरलेला ट्रक कोसळला, दोघांचा मृत्यू..

प्रतिनिधी✍🏻मारोती बारसागडे

चामोर्शी : तालुक्यातील आष्टी – गोंडपीपरी मार्गावरील वैनगंगा नदीत तेंदूपत्ता बोद घेऊन चंद्रपूरकडे जाणारा ट्रक कोसळल्याने दोघे जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ट्रक क्रमांक एम एच ३४ बी जी- ६१११ हा मध्यरात्री २:३० वाजताच्या दरम्यान पूल ओलांडताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक नदीत कोसळला.

ट्रकमध्ये वाहन चालक, वाहक आणि क्लीनर असे तिघेजण होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये कालु उर्फ कमलेश सतविंदर सलूजा (२५), नितीन दीपक बिके (३२) आणि अजय अनिल कारपेनवार असे जखमी इसमाचे नाव असून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.
सध्या तेंदूपत्ता संकलन पूर्ण झाले असून संबंधित कंत्राटदार तेंदूपत्ताचे वाहतूक करून आपल्या सोयीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या मुख्य गोदामात आपला तेंदूपत्ता घेऊन जात असतांना.

काल सायंकाळी सिरोंचा तालुक्यातून निघालेला ट्रक आष्टी मार्गे चंद्रपूरकडे जाताना मध्यरात्री जवळपास २.३० वाजताच्या दरम्यान आष्टी येथील वैनगंगा नदीत कोसळला. यात दोघेजण जागीच ठार झाले असून एकजण किरकोळ जखमी असल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली.

किरकोळ जखमी असलेला व्यक्ती कसेबसे बाहेर पडून पहाटेपर्यंत पुलावर प्रतीक्षा करत होता. पहाटेच्या दरम्यान आष्टीचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधित व्यक्ती किरकोळ जखमी अवस्थेत आढळला.
त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे आणि चमू करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here