पोंभुर्णा तालुक्यातील अतुलची अतुलनीय कामगिरी
पिएचडि शिष्यवृत्ती परीक्षेत देशात ८ वा तर राज्यात पहीला

पोंभुर्णा प्रतिनिधी :-पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील अतुल गव्हारे हा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व्दारे आयोजित अखिल भारतीय कृषी प्रवेश परीक्षा (पिएचडी) मध्ये कृषी अर्थशास्त्र या विषयात भारतातुन ८ वा तर महाराष्ट्रात पहिला आला आहे.तसेच ओबीसी प्रवर्गातुन ५ वा येऊन तो शिष्यवृत्ती साठी पात्र ठरला आहे.
याअगोदर एमएससी (कृषी अर्थशास्त्र) चे शिक्षण हिंदू विद्यापीठ बनारस येथुन पुर्ण केले आहे.येथेहि त्याने देशात ९ वा स्थान पटकावला होता हे विशेष.तेव्हाहि त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती ती शिष्यवृत्ती घेऊन त्याने पुढिल शिक्षण पूर्ण केले आहे.पिएचडी परीक्षेसाठी देशभरातुन १४०००विद्यार्थी बसले होते या परीक्षेत अतुलने अतुलनीय कामगिरी केली आहे.त्याच्यावर शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे. त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.