लोणी गाव कुठे आहे रे दादा? किमी दगडावरील नोंदीमुळे अनेकांना पडतोय प्रश्न..

0
1287

लोणी गाव कुठे आहे रे दादा? किमी दगडावरील नोंदीमुळे अनेकांना पडतोय प्रश्न…

अहो आश्चर्यमय राज्य महामार्गाच्या दगडावर असलेले गाव त्या मार्गावरच नाही

पोंभूर्णा- नवेगांव मोरे राज्य मार्गावर पोंभुर्णा वरुन “लोणी” ७ किमी

आनंदराव देठे

चंद्रपुर-जुनोना-पोंभूर्णा-नवेगांव मोरे या राज्य मार्गाचे काम युध्दपातळीवर सुरू असुन ते काम पूर्णत्वास येण्याच्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात आहे. किमी. दर्शक दगड उभे करून त्यावर कोणते गाव किती किमी? हे सुध्दा जवळपास लिहून झालेले आहे. पोंभूर्णा-वेळवा-नवेगांव मोरे ही याच मार्गावर येणारी गावे आहेत. पोंभूर्णा-वेळवा मार्गावर पोंभूर्ण्यानंतर एक किमी अंतरावर ” लोणी-७ किमी ” अशी एका दगडावर नोंद आहे. त्यामुळे लोणी हा गाव नेमका कुठे आहे,असा अनेकांना प्रश्न पडतो. कित्येक जण या लोणी गावाबद्दल चौकशी करतात. परंतु जो गाव या मार्गावर वसलेलाच नाही, त्या गावाची नोंद किमी. दर्शक दगडावर का केली असावी, हे न उमगणारे कोडेच आहे.

 

नवेगांव मोरे तलाठी साज्यातील वेळवा ते दिघोरी पायदळ रस्त्यावर किंवा चेक नवेगांव ते दिघोरी रस्त्यावर दिघोरी गावाजवळ ‘ लोणी ‘या रिठी गावाची तलाठी दप्तरी नोंद आहे. वेळवा मधल्या वेळवा (माल),वेळवा चेक, सेल्लुर नागरेड्डी, सेल्लुर चेक आणि लोणी अशा पाच गांवापैकी लोणी हे एक रिठी गांव आहे. त्या सोबतच सेल्लुर चेक आणि वेळवा चेक ही सुध्दा रिठी गांवे आहेत. लोणी या रिठी गावाचे एकुण कृषी क्षेत्रफळ २३.२९ हेआर. इतके सामायिक क्षेत्रफळ असुन या अंतर्गत एकुण १३ शेतकऱ्यांची नोंद आहे.

 

गांव म्हंटले की गावात बारा बलुतेदार आलेत, लोकवस्ती आलीच, अनेक कुटूंबे आलीत, सरपंच, पोलिस पाटील आलेत. पन आपल्याला ऐकुण आश्चर्य होईल, लोणी गावात यापैकी काहीच नाही. या गावात एकही कुटूंब वास्तव्याला नाही, किंबहूना लोकवस्तीच नाही. हे गांव फक्त कागदोपत्री तलाठी दप्तराच्या नोंदीत सापडते. मात्र पोंभूर्णा -वेळवा मार्गावर किलोमीटर दर्शक दगडावर दोन ठिकाणी या गावाची नोंद झाली आहे. सरकारी दप्तरी फक्त कागदावरच नोंद असलेल्या, पन मुळात अस्तित्वातच नसलेल्या गावाची नोंद राज्य मार्गांवरील किलोमीटर दर्शक दगडावर दोन ठिकाणी लिहिल्या गेल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात असुन विचारणाऱ्याला कुठे आहे म्हणून विचारता येते, पन सांगणाऱ्याला निश्चित सांगता येईनासे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here