वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे बळीराज्याच्या पिकाची नासाडी

0
446

वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे बळीराज्याच्या पिकाची नासाडी

विरेंद्र पुणेकर

राजुरा, ११ मार्च बाबापूर । परिसरातील शिवारांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. ते हाती आलेल्या पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हरीण, जंगली डुक्कर यांच्या धुमकुळाने शेतपिकांची नासाडी होत आहे. त्यातच या भागात काही दिवसांपासून पट्टेदार वाघ व अस्वलाचा संचार सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा परिसर राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत येताे. या वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, हरीण, अस्वल यासह अन्य प्राण्यांचा वावर असून त्या प्राण्यांनी खाद्य व पाण्याच्या शाेधात गाव व शिवाराच्या दिशेनेे माेर्चा वळविला आहे. बाबापूर व माणोली बूज शिवारात अनेक शेतकऱ्यांना दिवसा वाघाचे दर्शन झाले आहे. हे वन्यप्राणी मानवावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर वन्यप्राणी पिकांचे प्रचंड नुकसान करीत असून, वनविभागाच्या वतीने तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जाते. त्यामुळे या प्राण्यांचा कायम बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जोर लावून धरली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here