आमदार किशोर जोरगेवारांनी घेतली कोरोना लस ! नागरिकांनी काेराेना लस घ्यावी -जाेरगेवारांचे आवाहन !

0
732

आमदार किशोर जोरगेवारांनी घेतली कोरोना लस ! नागरिकांनी काेराेना लस घ्यावी -जाेरगेवारांचे आवाहन !
🔶🔴चंद्रपूर🟣🔶किरण घाटे🔶
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शुक्रवार दि.१२मार्चला कोरोना लस घेतली. नागरिकांनीही लस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन यावेळी आमदार जोरगेवार यांनी केले. यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डाॅ. अविष्कार खंडारे, डाॅ. नयना उत्तरवार, डाॅ. देवयानी भुते, डाॅ. शुभांगी मुनघाटे, रविना ताजने, सरिता लोखंडे, शामल रामटेके, छाया अरके, अंजू गायकवाड उपस्थिती होते. चंद्रपूर जिल्ह्यात मध्यंतरी आटोक्यात आलेला कोरोना आता हळू हळू पून्हा हात पाय पसरत आहे. त्यामूळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा,तसेच गर्दी न करता सर्तक राहण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केेले आहे. चंद्रपूरात व्याधीग्रस्त 45 वर्षा वरील नागरिकांसाठी तसेच 60 वर्षावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मोफत कोरोना लस दिल्या जात आहे. यासाठी लसीकरण केंद्र तयार करण्यात आले .असून नोंदनी केेलेल्या नागरिकांना लस दिल्या जात आहे. दरम्यान आज आमदार जोरगेवार यांनी तुकुम येथील कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाचा पहिला डोस घेतला.यावेळी लस सुरक्षीत असून नागरिकांनीही ही लस घेण्यासाठी पूढाकार घेण्याचे आवाहन आमदार जोरगेवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकातुन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here