महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे – आशिष ताजने

0
395

महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे – आशिष ताजने

नारंडा येथे महिला दिनानिमित्त मेळावा संपन्न

गावातील जेष्ठ महिलांचा सत्कार करताना सरपंचा अनुताई ताजने

कोरपना तालुक्यातील नारंडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत नारंडा,महिला ग्रामसंघ,दालमिया भारत व अंबुजा फॉउंडेशनतर्फे आयोजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने,वनोजा ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सविताताई पेटकर,युवा नेते आशिष ताजने,दालमिया फॉउंडेशनचे लक्ष्मण कुडमेथे,शाहीन मॅडम,तंटामुक्ती अध्यक्ष बंडू बोढे, अस्मिता बोंडे, ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे, शालू हेपट, वर्षा उपासे आशा वर्कर अर्चना मोहूर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांनी आपल्या अधिकारांची जाण ठेवून आपल्या न्याय हक्कांकरिता संघर्ष केला पाहिजे,तसेच समाजातील महिला आज या प्रत्येक क्षेत्रात पुढे जात असून ते सुद्धा आपल्या देशाच्या विकासात पुरुषांच्या बरोबरीने योगदान देत आहे,तसेच महिलांनी फक्त शेती न करता बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायाकडे वळून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे प्रतिपादन युवा नेते आशिष ताजने यांनी केले.
यावेळी महिलांनी सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून समाजात कार्य केले पाहिजे,तसेच प्रत्येक महिलांनी आपल्या सहकारी महिलांना सहकार्य करून प्रत्येक क्षेत्रात समोर जाण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन माजी सरपंच सविताताई पेटकर यांनी केले.

कार्यक्रमात गावातील जेष्ठ महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच महिलांचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले. तसेच कार्यक्रमाला गावातील मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन माधुरी गोहणे व आभार प्रदर्शन शालूताई मालेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here