नोटिस देताच पेट्रोलपंपच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांनी मागितली वाहनचालकाची लेखी माफी

0
750

नोटिस देताच पेट्रोलपंपच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांनी मागितली वाहनचालकाची लेखी माफी

 

खापरखेडा : दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल भरताना पेट्रोल पंप च्या कर्मचाऱ्यांद्वारे वारंवार पेट्रोल खाली पडताना झालेल्या हानि विषयी तक्रार वाहनचालकाने पेट्रोलपंप मैनेजरकड़ें केल्यामुळे त्या वाहनचालकाला मानसिक त्रास देने कर्मचाऱ्याना अधिकच भारी पडले. पिडीत वाहनचालकने या घटनेची तक्रार करनेसाठीच पेट्रोल पंप मेनेजर, पेट्रोल मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयला नोटिस देताच मेंनेजर आणि दोन्ही कर्मचाऱ्यांनी वाहनचालकाला माफीनामा देत लिखित माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण आपसात आटोक्यात आले.

पिडीत वाहनचालक शेखऱ कोलते हे एका साप्ताहिक वृतपत्राचे उपसंपादक असून खापरखेडा येथील जगदंबा पेट्रोल पंपचे जवळपास नऊ दहा वर्षापासून रेगुलर ग्राहक आहेत. फील्डवर्क आणि व्यवसाय नुसार त्यांना दर दोन दिवसानन्तर पेट्रोल भरावे लागते. आज पर्यंत त्यानां पेट्रोल पंपवर कोणताही त्रास झाला नाही , परंतु नोव्हेबर 2021 ते जानेवारी 2022 या कालावधीत कमर्चारी द्वारे गाडीमध्ये पेट्रोल भरताना जवळपास आठ वेळा पेट्रोल खाली सांड़ले. विचारपुस केल्यावर कर्मचाऱ्यांनी पेट्रोल पंपचे नोजल आणि सेंसर खराब असल्याचे सांगितले. कमी पेट्रोल सांड़ले आणि वेतनधारी गरीब कमर्चारी असल्याने कोलते यांनी पुढे यावर लक्ष देण्याची ताकीद देवून सोडून दिले. परंतु त्यात काहीच सुधारना झाली नाही आणि जानेवारी 2022 मध्ये पेट्रोल भरताना पुन्हा जवळपास 360 रु चे पेट्रोल खाली सांड़ले. यावेळी नुकसान जास्तच झाल्याने कोलते यांनी मौखिक तक्रार करत त्या पेट्रोलचे फक्त शंभर रुपये देत बाकीचे पैशे देण्यास नकार दिला. परंतु त्या कर्मचाऱ्यांने ते पैशे न घेता कोलते यांना काही अपशब्द बोलून ग़ैरवर्तवनुक केली. कर्मचाऱ्यांचीच चुकी असताना त्यांच्या अश्या उद्धट व्यवहारमुळे कोलते व्यथित झाले. सोबतच कोलते जेव्हा जेव्हा पेट्रोल भरनेसाठी पंपवर जायचे तेथील कर्मचाऱ्यांद्वारे अपशब्द वापरून तेथील अन्य ग्राहकांसमोर कोलते यांचा अपमान केला जावु लागला.

नोटिस देताच मागितली माफी
पिडीत वाहनचालक शेखऱ कोलते यांनी एक ग्राहक म्हणून या घटनेला गंभीरतेने घेत सविस्तर घटनासहित पेट्रोल मंत्रालय, सेल्स ऑफिसर आणि जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी बनवून एक नोटिस त्या पेट्रोल पंप मेनेजरला पाठविली, ज्यामध्ये पुढील दहा दिवसांच्या आत लेखी जवाब न दिल्यास पेट्रोल पंपच्यां विरुद्ध पेट्रोलियम विभागचे वरिष्ठ कार्यालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकड़ें प्रकरण दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरु करणार असल्याचे नमूद होते.

नोटिस आणि न्यायालयीन प्रक्रिया विषयी सूचना वाचून अखेर जगदंबा पेट्रोल पंपचे मेनेजर महेंद्र गजभिये यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना फटकारले असता नरेंद्र बागड़े आणि देवानंद पाटिल या दोन्ही कर्मचाऱ्यांनी लेखी माफीनामा देवून केलेल्या ग़ैरवर्तवनुक बद्दल कोलते यांची माफी मागितली. सोबतच पेट्रोल पंपचे मेनेजर महेंद्र गजभिये यांनी भविष्यात कोणत्याही ग्राहका सोबत अशे ग़ैरवर्तवनुक होणार नाही अशे लेखी हमीपत्र सुद्धा शेखऱ कोलते यांना दिले.

ग्राहक हा नेहमी राजाच असतो…
“उत्पाद आणि त्याची कीमत मुळे ग्राहक आणि दुकानदार हे दोघेही एकमेकांवर अवलंबून असतात, परंतु चुक नसताना आपल्या अधिकारांसाठी लढन्याच्या संवैधानिक शक्तिमुळे ग्राहक एक राजाच असतो. दुकान किंवा कार्यालयमध्ये आवश्यक सुविधासहित ग्राहकासोबत सभ्य वर्तवनुक करने विषयी नियमांची तरतूद ग्राहक हक्क संरक्षण कायद्यामध्ये करण्यात आली आहे. परंतु अज्ञानतेमुळे आजकल ग्राहकांना एका गुलाम सारखे पाहले जाते . हे पूर्णता असंवैधानिक असून ही परिस्थिती आता बदलवीने अतिआवश्यक आहे.”

शेखऱ कोलते
उपसंपादक – नागरिक हक्क संरक्षण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here