वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक यांच्या गाडीची हल्लेखोरांनी केली तोडफोड

0
418

वेकोली बल्लारपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक यांच्या गाडीची हल्लेखोरांनी केली तोडफोड

वाहनचालकास जबर मारहाण, आरोपी फरार

अमोल राऊत, 5 ऑगस्ट : वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या महाव्यवस्थापक यांचे वाहनचालक गौतम काळे (35) यांच्यावर हल्लेखोर यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना जबर मारहाण केली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. कारचीही ( कार क्रमांक एमएच 34 बिजी 9710) तोडफोड हल्लेखोरांनी केली. ही घटना 3 तारखेला सायंकाळच्या सुमारास घडली.
राजुरा पोलीस घटनास्थळी दाखल होताच पोलिसांचे वाहन पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला असून ते फरार आहेत. काळे यांच्यावर शास्त्रांसह हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काळे यांचा मोबाईल व पाकीट हल्लेखोरांनी पळविले. याप्रकरणी हल्लेखोर कृष्णा कुंभाला यांच्यासह अन्य तिघांवर राजुरा पोलीस स्टेशन येथे 394 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here