एकरक्कमी मालमत्ता कर भरणाऱ्यांना शास्तीत सूट, महानगरपालिकेच निर्णय

0
438

एकरक्कमी मालमत्ता कर भरणाऱ्यांना शास्तीत सूट, महानगरपालिकेच निर्णय

राजु झाडे

चंद्रपूर:- एकरक्कमी मालमत्ता धारकांना सन 2020-21 या वर्षातील करामध्ये 100% शास्तीत सूट देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरातील एकरक्कमी मालमत्ता धारकांना दिलासा मिळाला आहे.
मार्च 2020 पासून शहरात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून शासनाकडून लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील लोकांना कराचा भरणा करता आला नाही. तसेच प्रशासकीय कारणास्तव व
शासनाकडून वारंवार लॉकडाउन करण्यात आल्यामुळे मालमत्ता धारकांना सन 2020-21 चे मालमत्ता कर देयक मिळण्यात विलंब झाला आहे.
चंद्रपूर महानगरपालिका दि 31-7-2020 ला झालेल्या विडिओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम1949 चे कराधन 8 मधील कलम 51अन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून 2020-21 पर्यंतची थकबक्की व मालमत्ता व इतर कराचा, तसेच 2020-21 मधील कराचा एकरक्कमी भरणा दि. 1-11-२०२० ते 30-11-2020 पर्यंत करणाऱ्या मालमत्ता धारकाला ही 100% शास्तीत सूट देण्यात येणार आहे. तरी एकरक्कमी मालमत्ता धारकांसाठी हा दिलासा दायक निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here