नांदा येथे बिरसा मुंडा जयंती थाटात संपन्न

0
515

नांदा येथे बिरसा मुंडा जयंती थाटात संपन्न

विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन साजरी केली जयंती

 

नांदाफाटा, नितेश शेंडे : नांदा येथे बिरसा मुंडा जयंती चे औचित्य साधून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरामध्ये राहणाऱ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना च्या वतीने आदिवासी सल्ला शक्ती जवळ दुपारच्या सुमारास शहीद क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा यांची 140 वी जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित किशोर मडावी, अनिल पेंदोर,प्रवीण कुरसंगे, दीपक आत्राम, पुरुषोत्तम मडावी इत्यादी उपस्थितांच्या हस्ते शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर बिरसा मुंडा यांचा जीवन चित्रपट मान्यवरांच्या मार्गदर्शनातून प्रगट करण्यात आला. स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जगात आदिवासी समाजाला आता शिकल्याशिवाय पर्याय नाही, शिवाय इतरांच्या तुलनेमध्ये आपली संस्कृती आणि आपला वारसा जपायचा असेल व आपली संस्कृती बळकट बनवायची असेल तर शहिदांची जीवन शैली व व्यसनांचा त्याग करण्याबाबत अनेक संकल्प करण्यात आले. एवढेच नव्हे तर आदिवासी समाजामध्ये अशिक्षितपणाचे वाढते प्रमाण बघता आपला परिसर सर्वच बाजूंनी प्रगतीशील असतानासुद्धा आपण आपली परिस्थिती का सुधारू शकत नाही. या गोष्टीचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. असे मौलिक मार्गदर्शन उपस्थित प्रवीण कुरसंगे यांनी केले. मान्यवरांनी विविध कार्यक्रमांना समाजाची उपस्थिती वाढविण्यास संबंधी विविध प्रकारच्या योजना, शासकीय असो की निमशासकीय असो आपण शासनाकडून हिसकावून घेतल्या पाहिजे. याकरिता गावांमध्ये आदिवासी समाजातील सुशिक्षित युवकांनी एकत्र येऊन सर्वांना सहकार्य करावे असे विचार किशोर मडावी यांनी व्यक्त केले. मान्यवरांमध्ये रामचंद्र कोडापे, रामचंद्र साईकाटे, सचिन मडावी,गंगाधर मेश्राम, महादेव आत्राम, श्यामदेव आत्राम, नामदेव तोडासे, कृष्णा उईके, ईश्वर उईके, गजानन आत्राम, अजय गेडाम हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संपूर्ण समाजबांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमादरम्यान नांदा, राजुर गुळा, लालगुडा या गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी समाज बांधव नांदा यांच्या वतीने बुक व पेन पेन्सिल वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here