नांदा येथील स्वामी विवेकानंद वाचनालय ठरत आहे तालुक्यात आदर्श

0
240

नांदा येथील स्वामी विवेकानंद वाचनालय ठरत आहे तालुक्यात आदर्श

लोकसहभाग ठरला महत्वाचा

नांदा फाटा : “वाचाल तर वाचाल, आणि वाचाल तर शिकाल” हा अमूल्य असा संदेश आहे. वाचन करणारी व्यक्ती अधिक प्रगल्भ व वैचारिक कक्षाही रुंदावलेली असते. एकूणच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वाचन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच उद्देशाने मागील दहा वर्षा पूर्वी नांदा येथे स्थापन केलेले स्वामी विवेकानंद वाचनालय आता तालुक्यात आदर्श ठरत आहे.

आपल्या गावातील युवकांना वाचनाची सवय लागून आदर्श व्यक्ती घडावे एवढेच नाहीत प्रशासनात उच्च पद गाठून मोठं अधिकारी व्हावं याच उदात हेतूने नांदा येथे निब्रड यांचा कवेलुचा घरात वाचनालय सुरू करण्यात आले. काही दिवसांनी इमारतीची गरज भासली ती इमारत देखील गावातील राजकिय नेत्यांचा मदतीने उपलब्ध झाली.

मुले वाचानालयात येत होती मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या करीता पुस्तके नव्हती. युवकांनी शक्कल लढवत आपल्या वाढदिवसा निमित्त वाचनालयाला पुस्तके भेट देण्याची ठरविले पुस्तके गोळा झाली मात्र ठेवायची कुठे हा प्रश्न पडला. शासकीय सेवेत असलेल्या मित्राला मार्ग दर्शनासाठी बोलावून त्याला व्यथा सांगत त्यांचा कडून पुस्तक ठेवायची आलमारी ची सोय झाली. हळू – हळू कोणी पंखा तर कोणी बोर्ड अशा लोकसहभागातून
सुविधा वाचनालयाला प्राप्त झाल्या. ग्राम पंचायत लागूनच असल्याने त्याचा दृष्टीस सर्व येत होते त्यांनी फोल्डिंग खुर्चा तर उपलब्ध करून दिल्याच लगेच ४० हजार रुपयाची स्पर्धा परिक्षेची पुस्तके सुध्दा भेट दिली.

गावातील युवकांनी वाचनालयाचा लाभ घेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला त्यात दहावी व बारावीला असणारे मुले सुध्दा अभ्यासाला यायला लागली. आता दरवर्षी तालुक्यात दहावी व बारावी मध्ये टॉप येण्याचा मान या वाचनालयतील मुलांना जातो.

मागील चार ते पाच वर्षात शासकीय सेवेत रुजू होण्याची संख्या अधिक झाली असून जशी – जशी अभ्यास करणाऱ्या युवकांची संख्या वाढत जात आहे तसे निकाल सुध्दा हाती येत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात चिकाटीने अभ्यास करून १२ मुले शासकीय सेवेत रुजू झाली आहे. आता पर्यंत वाचनालयातील २९ मुले ही शासकीय सेवेत रुजू झाली आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकत्याच नांदा ग्राम पंचायत ला दिलेल्या भेटीत वाचनालयाची पाहणी करून विद्यार्थ्या सोबत हितगुज साधून प्रशंसा देखील केली. गावात उभारलेले वाचनालयाच छोटंसं रोपट सुसज्ज सर्व सोईयुक्त ते आता मोठ झालं असून तालुक्यात आदर्श ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here