नांदा येथील भूमाफियांवर करवाई करा अन्यथा आमरण उपोषण : चंद्रप्रकाश बोरकर यांची मागणी

0
237

नांदा येथील भूमाफियांवर करवाई करा अन्यथा आमरण उपोषण : चंद्रप्रकाश बोरकर यांची मागणी

भूमाफियांना महसूल विभागाची साथ

लेआऊट टाकून गुंठेवारी पद्धतीने विक्री सुरू

नांदा फाटा :– कोरपणा तालुक्यातील सर्वात मोठं गाव व औद्योगीक नगरी तसेच विविध कारणांनी सुध्दा प्रचलीत असणारे गाव म्हणून नांदा गावाला ओळखल्या जाते. नांदा परिसर सिमेंट कारखान्याने भर-भराटीस आल्याने दरवर्षी लोकसंख्येचे प्रमाण वाढतच चालली असल्याने याचा भूमाफिया फायदा घेत शासनाची परवानगी न घेता अनाधिकृत लेआऊट टाकून परस्पर विकली जात आहे. यामुळे नांदा येथील अनाधिकृत भूमाफियांवर दंडात्मक कारवाई करा अन्यथा आमरण उपोषण करणार अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रापंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.

नांदा फाटा येथे परिसरात सिमेंट उद्योग असल्याने मागील काही महिण्यापासून नांदा फाटा – पिंपळगाव रोड, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा प्रवेशद्वार जवळ सर्वे क्र. १९/३ व नुकतेच नांदा ग्रामपंचायतीच्या समोर सर्वे क्र. ११/२ या कृषक जमिनीवर अनाधिकृत लेआऊट टाकून सर्हास पने विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे शासनाची कोणतीही परवानगी न घेता यांचा व्यवसाय जोरात सुरू आहे.

भूमाफिया कृषक जागेवर लेआऊट टाकून नागरिकांना गुंठेवारी पद्धतीने ४०० ते ५०० स्के.फुट प्रमाणे विकणे सुरू आहे. गरजू नागरिकांना पकडून हमीपत्र देवून त्याचा कडून जागेचा रक्कम घेत असल्याची खात्रीदायक माहिती आहे. याचे कडे मात्र स्थानिक महसूल अधिकारी माहीत असताना देखील जाणीव पूर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. या उलट मात्र भूमाफियांना लवकर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी कागदोपत्राची साथ देताना दिसून येत आहे.

या अनाधिकृत लेआऊट यांचे भविष्यात रस्ते नाल्या विद्युतिकरण पाणी व्यवस्था अशा मूलभूत सुविधेसाठी नांदा ग्राम पंचायतीवर त्याचा आर्थीक बोझा पडणार असून हे परवडण्या जोगे नाही त्यामुळे हे अनाधिकृत लेआऊट यांचेवर कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषणा करणार अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव व नांदा ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश बोरकर यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here