पश्चिमशेष सिद्धेश्वर मंदिर आंभोरा (रिठ) सुसा द्वारा रविंद्र शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

0
493

पश्चिमशेष सिद्धेश्वर मंदिर आंभोरा (रिठ) सुसा द्वारा रविंद्र शिंदे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

 

 

वरोरा (प्रतिनिधी) : मागील वर्षी जगामधे कोरोना या विषाणूजन्य रोगाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले. या काळात सामान्य नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल झाले, त्या काळात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्ट च्या माध्यमातुन लोकांना आरोग्य विषयक सोई सवलती उपलब्ध करून दिल्या. तसेच त्यांचे भद्रावती येथील श्री मंगल कार्यालयात कोविड सेंटर ची उभारणी करून लोकांना आरोग्यदायक सेवा निशुल्क उपलब्ध करुन दिल्या.
याची दखल घेत (दि.१) ला पश्चिमशेष सिद्धेश्वर मंदिर आंभोरा (रिठ) सुसा द्वारा आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला रवि शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली असता, सुसा, मोखाळा,आल्फर, सातारा येथील कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यावेळी चिंतामणजी डहाळकर, सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी, रामदासजी डहाळकर, सुसा येथील सरपंच, शांताराम पाल, दत्ता बोरेकर, चाफले यांची उपस्थिती होती.
यावेळी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे यांनी बँकेच्या विविध कल्याणकारी योजना असुन कास्तकारांनी व शेतमजुरांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

सोबतच ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोनाने मृत झालेल्या पालकांच्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व गरीब-गरजु कूटुंबातील पाल्यांच्या विवाहाचा खर्च ट्रस्ट करणार असुन त्याबाबतची नोंदणी अभियान सुरु झाले आहे. इच्छुकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट उचलत आहे. तेव्हा गरजुंनी ट्रस्टच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवि शिंदे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here