तरुणांच्या उपक्रमाला आमदारांचा मदतीचा हात
बंदर(शिवापुर) येथील ज्ञानशाळेला आ.किर्तीकुमार भांगडिया यांचेकडून दोन संगनक संच भेट, लॉकडॉऊन काळातील शिक्षण

आशिष गजभिये
तालुक्यातील बंदर(शिवापूर) येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांकडून मागील दोन महिन्यांच्या काळापासून समाज मंदिरात ज्ञानशाळा उपक्रम सुरू आहे.या उपक्रमास भेट देत आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची अडचण लक्षात घेत दोन संगणक संच भेट जाहिर केली आहे.
कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावाने राज्यभरातील शाळा बंद स्थितीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नेटवर्क अभावी आणलाइन शिक्षणाला मुकावे लागत आहे.ही बाब लक्षात घेत बंदर(शिवापूर) येथील युवकांनी पुढाकार घेत गावातील समाजमंदिरात विद्यार्थ्यांसाठी ज्ञानशाळा व अभ्यासीका उपक्रम सुरू केला आहे.
विधानसभा क्षेत्रात आढाव्यदरम्यान शुक्रवारला आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी या ज्ञानशाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.उपक्रम राबविनाऱ्या युवकांचे कौतुक करीत अभिनंदन केले. संवादादरम्यान विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत दोन संगणक संच भेट देण्याचे जाहीर केलं.या प्रसंगी पंचायत समितीचे गटनेते अजहर शेख,जेष्ठ भाजप नेते वसंत वारजूकर, राजू देवतळे,माजी सरपंच बंडू तराळे,श्रीभरोष ढोक,आशिष जीवतोडे,मनी रॉय उपस्थित होते.
शेतकऱ्याच्या बांधावर केली पाहणी
आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी शिवापुर(बंदर), खडसंगी, वहानगाव,बोथली परीसरातील शेतकऱ्यांनच्या बांधावर जाऊन धान,कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करीत त्यांचा समस्या एकूण घेतल्या.या बाबत शासनाला पाठपुरावा करून नुकसानभरपाई मिळवून देण्याच आश्वासन दिलं.