रोहित पवार विचार मंच चे प्रसिद्धी पत्रकाकातुन आंदोलन करण्याचा इशारा

0
312

रोहित पवार विचार मंच चे प्रसिद्धी पत्रकाकातुन आंदोलन करण्याचा इशारा

अमोल राऊत

नागरी ते माढेली जाण्यासाठी उखर्डा मधून जाणार रस्ता हा सोयीस्कर आहे. तसेच वेळ वाचवणार देखील आहे.
परंतु गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. हे दिसत असून देखील प्रशासन कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचलतांना दिसत नाही.
उखर्डा रस्त्यावरून नागरी ते माढेली रस्ता चांगल्या स्थितीत असल्यास 5 मिनीटात अंतर कापता येते परंतु आता रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे हेच अंतर जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा वेळ लागतो. त्यासोबत दुचाकी – चारचाकी वाहनवरून प्रवास करणाऱ्याना होणारे शारीरिक त्रास व गाड्यांचा वाढणार नाहक खर्च यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
उखर्डा, नागरी परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करताना होणार त्रास लक्षात घेऊन व तसेच, काही नागरिकांनी सदरचा रस्ता व्यवस्थित करण्यात यावा याकरिता, रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अभिजित कुडे यांच्याकडे मागणी केली या संदर्भात उखर्डा रस्त्यावर रो. प. वी. मंच माध्यमातून मुर्दाड सत्ताधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी, अभिजित कुडे यांनी सत्ताधिकाऱ्यांवर निशाणा साधत जर, सदरचा रस्ता लवकरात लवकर व्यवस्थित केला नाही तर, पुढील आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा अभिजित कुडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.
भविष्यात रस्त्यावरील खड्यामुळे अपघात होऊन जीवित हानी होऊ नये तसेच, जनतेच्या मतांवर निवडून आलेल्या नेत्यांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा देत रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलना यावेळी रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अभिजित कुडे , रोशन भोयर, अनिकेत राऊत, तेजस उरकुडे, अरविंद कुडे, विनोद कोठारे, तेजस उरकुडे , रंजीत कुडे, विजय कुडे, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here