चंद्रपुर चे रक्त सहयोजक रिंकु कुमरे यांनी गोंदियाच्या रुग्णाला उपलब्ध करून दिले ‘ए2बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त

0
546

चंद्रपुर चे रक्त सहयोजक रिंकु कुमरे यांनी गोंदियाच्या रुग्णाला उपलब्ध करून दिले ‘ए2बी पॉझिटिव्ह’ गटाचे रक्त

 

 

चंद्रपुर चे रक्त सहयोजक रिंकु कुमरे याने गोंदियाच्या आजारी मुलीसाठी भोपाळमधील रक्तदात्यास नागपूरला येथे बोलावून रक्तदान करण्यास विनंती केली.

गोंदिया जिल्ह्यातील एका 17 वर्षिय चांदनी खुरसंगे नामक मुलीला सदर दुर्मिळ रक्तगताची आवश्यकता होती. गोंदिया रेलवे स्टेशन जवळ केटीएस या रुग्णालयात भरती होती.

A2B पॉझिटिव्ह रक्त जे खूप दुर्मिळ आहे. अशा रक्ताची गरज भासली. रक्त न मिळाल्यास रुग्णाचे जीव जाण्याची धोकादायक माहिती डॉक्टरांनी दिली होती.

अशा बिकट परिस्थितीमध्ये चंद्रपूर येथील रक्तपुरवठा करणारे रक्त सह संयोजक रिंकू कुमरे यांनी देशाच्या विविध भागात संपर्क साधला. अनेक ठिकाणी माहिती घेतल्यानंतर मध्यप्रदेश मधील भोपाळ या ठिकाणी राहणारे रक्तदाता हितेश अरोरा यांच्याशी रिंकु कुमरे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करुन लगेच मध्यप्रदेश भोपाळ मधुन नागपुर ला बोलावून नागपुर मधील सहकारी राहुल आवठे आणि सेवा फाऊंडेशन टीमने ब्लड बैंक ला अरोरा यांना घेवून जाऊन रक्त काढून त्यांना परत भोपाळ साथी रवानगी दीली.

यापुढील कार्य म्हणजे सदरचे रक्त रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी रिंकू कुमरे यांनी स्वतः गोंदिया येथे जावून ते अनमोल व दुर्मिळ रक्त डॉक्टरांना उपलब्ध करुन दिले आणि एका गरीब मूलीचा जीव वाचविला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here