चंद्रपूर जिल्हा योगासन स्पर्धेत राजू-याचा रोहन धोटे प्रथम!
राजूरा (चंद्रपूर), किरण घाटे : अठरा वर्षा अंतर्गत झालेल्या याेगासन स्पर्धेत रोहनने कठीण आसन प्रकारात 1 मिनिटं 22 सेकंद पर्यत शिर्षासन करून प्रथम क्रमांक पटकाविल्यामुळे ताे राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे. राजू-याच्या
पतंजली योग समितीच्या वतीने गुरुवार दि. २९ जुलैला स्थानिक शिवाजी महाविद्यालयात भूतपूर्व आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते राेहनचा भव्य सत्कार करण्यांत आला.
यावेळी पतंजली महिला जिल्हा प्रभारी स्मिता रेभनकर, भारत स्वाभिमानच्या महामंत्री ज्योतीताई मसराम, सपना नामपल्लीवार, अपर्णा चिडे यांनी रोहनला पुष्पगुच्छ देऊन पुढे येणांऱ्या स्पर्धेंसाठी शुभेच्छा दिल्या. याच स्पर्धेच्या अनुषंगाने टाळ्यांच्या कडकडाटात रोहनने शिर्षसनाचे उपस्थितीतांना प्रात्यक्षिक करून दाखविले.
रोहनच्या या यशाचे प्राचार्य संभाजी वरकड, शिवाजी महाविद्यालय राजुरा, उपप्राचार्य राजेशजी खैरांनी, मुकरुजी सेलोटे, मिलिंद गड्डमवार, अरुणा गावत्रे, प्रा. पुंडलिक उराडे, प्रा.हरिभाऊ डोर्लीकर, अरुण चौधरी तथा कार्यक्रमाला उपस्थित योगप्रेमींनी ताेंड भरुन कौतुक केले. विदर्भातील अतिदुर्गम भागातील राजूरा निवासी असलेला राेहन हा महाराष्ट्रातील नामवंत महिला सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा रामकृष्ण धाेटे यांचा कनिष्ठ चिरंजिव असुन शैक्षणिक क्षेत्रातही राेहनची प्रगती उल्लेखनिय अशीच आहे.
दरम्यान आज सहजं सुचलं व्यासपीठाच्या नागपूरच्या याेग शिक्षिका मायाताई काेसरे, डाँ. स्मिता मेहेत्रे, डाँ. भारती नेरलवार, जेष्ठ कवयित्री गिता बाेरडकर, न्रूत्य कलावंत प्रभा अगडे, पथ्राेडच्या पुरस्कार विजेता जेष्ठ लेखिका विजया भांगे, हैद्राबादच्या वयाेव्रूध्द कांदबरीकार विजया तत्वादी, चंद्रपूरच्या सहजं सुचलं मुख्य संयाेजिका सुविधा बांबाेडे, नागपूर साैंदर्य स्पर्धा विजेता कल्याणी सराेदे गडचिराेलीच्या साैंदर्य स्पर्धा विजेता मनिषा मडावी, अधिवक्ता कविता माेहरकर, सहजं सुचलं कलाकुंज प्रमुख उज्वला यामावार, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रूति उरानकर, नागपूरच्या डाँ. अंजली साळवे मूलच्या जेष्ठ कवयित्री स्मिता बांडगे, चिमूर शंकरपूरच्या कवयित्रि वर्षा शेंडे, बल्लारपूरच्या शिक्षिका व कवयित्रि अर्जुमन शेख, सहजं सुचलं काव्यकुंजच्या सराेज हिवरे, चंद्रपूरच्या मंथना नन्नावरे, प्रतिभा चट्टे, स्म्रूति कांबळे, शिवानी नन्नावरे, सुवर्णा कुळमेथे, मूलच्या कवयित्रि प्रतिमा नंदेश्वर, चंद्रपूरच्या विद्यमान नगरसेविका छबुताई वैरागडे, उपराजधानी नागपूरच्या भूतपूर्व नगरसेविका नयना झाडे, राजू-याच्या संजिवनी धांडे, सहजं सुचलं मिडीया ग्रुपच्या संयाेजिका अल्का सदावर्ते , सविता भाेयर, क्रीडापटु कु. सायली टाेपकर , समाज सेविका प्रदन्या भगत, दुर्गापूरच्या कविता चाफले, कवयित्रि व शिक्षिका सिमा पाटील, साैंदर्य स्पर्धा विजेता मुंबईच्या शितल पाटील, सरीका खाेब्रागडे, सुवर्णा कुळमेथे, मुंबई सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका रजनी रनदिवे, वर्धेच्या शाेभा राेकडे, भारती मैदपवार, स्रूष्टि राेकडे, अमरावतीच्या स्वप्ना राजगुरे चंद्रपूरच्या पुनम रामटेके, सुवर्णा लाेखंडे, राजु-याच्या सुविधा चांदेकर, प्रतिक्षा झाडे, श्रध्दा हिवरे, अश्वनी रायपूरे, प्रतिक्षा मैदपवार, पुनम जांभुळे, रविना डेकाटे, रुतुजा साेनवाने, पुनम काेसरे, धनश्री शेंडे, वनिता नागापुरे, रसिका ढाेणे, पायल आमटे, कांचन मून, वणीच्या रजनी पाेयाम, मुंबईच्या भाग्यश्री सानप, मेघा भांडारकर आदींनी राेहनचे मुक्तकंठाने काैतुक करुन त्यास भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे .