३० मार्च पर्यंत प्रदूषण नियंत्रण करा अन्यथा सिमेंट वाहतूक रोखली जाणार.

0
747

३० मार्च पर्यंत प्रदूषण नियंत्रण करा अन्यथा सिमेंट वाहतूक रोखली जाणार.

रा. काॅ. ने पत्रकार परिषदेत दिला माणिकगड सिमेंट प्रशासनास इशारा.

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

– तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या युनिट माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून विविध प्रकारच्या आजार डोके वर काढत आहे व शहरातील विविध भागात घराच्या छतावर धुळीचे कणीचे साम्राज्य पसरले दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घट होत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे अशा एक ना अनेक समस्या या सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या ३० मार्च पर्यंत कंपनीने प्रदूषण आटोक्यात नाही आणले ३० मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कंपनी द्वारा होणारी सिमेंट वाहतूक पुर्ण पणे रोखली जाणार अशी माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या युनिट माणिकगड सिमेंट कंपनीच्या धुरामुळे आणि प्रदूषणामुळे शहरातील आणि परिसरातील नागरिकांना विविध आजारांनी ग्रस्त असल्याचे लक्षात येते आहे जसे त्वचा रोग, डोळ्याचा आजार, श्र्वसनाचा त्रास, घशाचे आजार, कानाचे विकार, हृदयाचे विकार किडनी चे आजारांना आमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे शहरात सध्या जिकडे-तिकडे धुळीचे साम्राज्य दिसत आहे त्यामुळे शहरात असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूहाच्या युनिट माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रशासनाने जर येत्या ३० तारखेपर्यंत प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले नाही तर माणिकगड सिमेंट कंपनीमधून होणाऱ्या सिमेंट वाहतूक रोखली जाणार आणि प्रदूषणामुळे परिसरातील घरांच्या छपरावर जमा झालेली धूळ जमा करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी भेट म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात येणार आहे असे ही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस चे राजुरा विधानसभा अध्यक्ष अरूण निमजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रविण काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा गडचांदूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबिद अली. सुनील आरकीलवार, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,प्रविण मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव,करण सिंग राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष,प्रविण कोल्हे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here