कढोली बु. येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात

0
232

कढोली बु. येथे सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन

राजुरा (ता. प्र.) : सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर , स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा कढोली बुद्रुक येथे सुदर्शन बोबडे ते शेख सुबान यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे, अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये या विकास कामाचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले व या विकासकामाला सुरुवात झालेली आहे.

या प्रसंगी कढोली बु. चे सरपंच शैलेश चटके, उपसरपंच सुषमा उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता हिंगणे, संजय किंगरे, सुनंदा एकरे, प्रतिभा गोरे, गीता पडवेकर, लक्ष्मण एकरे, ग्रामसेवक राजहंस खोब्रागडे, गजानन एकरे, रामचंद्र झाडे, नागोबा एकरे यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here