भांबोरा गावातील जनतेवर प्रशासनाकडून होणारा अत्याचारावर आळा घाला. -गोर सेना

0
1245

भांबोरा गावातील जनतेवर प्रशासनाकडून होणारा अत्याचारावर आळा घाला. -गोर सेना

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व पालकमंत्री यांना गोर सेना जिल्हा संघटनेकडून निवेदन देण्यात आले. भांबोरा ता. घाटंजी गावातील जनतेवर प्रशासनाकडून येथील मागील 26/07/2020 पासून कोविड-19 च्या नावाखाली भांबोरा गावातील लोकांना घाटंजी पोलीस विभागाकडून व तहसील प्रशासनाकडून सतत त्रास देण्यात येत आहे. प्रशासनाच्या या त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विष प्राशन करून स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रशासन व गावकऱ्यांमध्ये घडलेल्या घटनेचा प्रशासनाने आपल्या सोईनुसर अर्थ लावून 21 लोकांवर अनावश्यक गुन्हे दाखल केले आहे. एवढ्या मोठ्या कार्यवाही नंतरही स्थानिक प्रशासन थांबले नसून जे गावकरी गुन्हेगार नाहीत त्यांचा या घटनेशी संबंध देखील नाही अशाही गावकऱ्यांना त्रास देण्याचे व प्रशासनाचा दबदबा निर्माण करण्यासाठी निरपराध गावकऱ्यांना पकडण्याचे धाडस सुरू आहे. कृपया हे दडपशाहीचे धोरण थांबविण्यात यावे व भांबोरा ग्रमवसियांना भयमुक्त करावे. असेच दडप शत्र सुरू राहल्यास येणाऱ्या काळात गोरसेने कडून मोठे आंदोलन उभे केले जाईल व यास प्रशासन जबाबदार राहील. निवेदन देते वेळीस गोर सेना जिल्हा अध्यक्ष किशोर पालत्या, गोर सेना जिल्हा सचिव प्रफुल्ल जाधव, काशिराम नायक, अक्षय राठोड, सौ. सरोज भारत जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here