धारदार शस्त्राने बल्लारपूर शहरात एकाची हत्या

0
570

 डुक्कर चोरी केल्याच्या वादातून घटना घडली.

 

प्रतिनिधी /राज जुनघरे

 

चंद्रपूर / बल्लारपूर / विदर्भ :- डुक्कर चोरी केल्याच्या वादातून बल्लारपूर शहरात रविवारी सायंकाळी ६.३० वाजता चे दरम्यान सख्या भावंडांकडुन हत्या केल्याची घटना घडली. हि घटना स्थानिक आंबेडकर वार्ड परिसरात रेल्वे लाईन जवळ दुचाकीवरून जात असताना घडली. मारेकरी आत्मसमर्पण करून पोलिसांच्या स्वाधीन केले.

मारेकरी व मृतक यांचा डुक्कर विकण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दोघांत नेहमी वादविवाद होत असत. दोन दिवसांपूर्वी मृतक व मारेकरी यांच्यात वाद विकोपाला गेले. मारेकरी आणि मृतक हे सखे भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. मृतक राकेश बहूरिया हा रविवार च्या सायंकाळी ६.३० वाजताचे दरम्यान आपली स्वतःची दुचाकी क़. एम एच ३४ – बिक्यू १७८५ ने जात असता मारेकरी ने संधी साधून चालत्या वाहनावर हल्ला केला. मृतक राकेश च्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. अचानक झालेल्या हल्याने राकेश गाडीवरून खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. मारेकरी राजकुमार उर्फ राजू बहुरीया हत्येनंतर बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच आंबेडकर वार्ड रेल्वे लाईन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिस घटना स्थळी तात्काळ पोहोचले आणि तणाव निवळला. घटनेतील दुसरा मारेकरी फरार असून बल्लारपूर पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here