गौरीपुर येथे सेफ वॉटर नेटवर्क इंडिया व मेक इन गडचिरोली च्या वतीने नागरिकांकरिता शुद्ध पाणी पिण्याची सोय

0
387

गौरीपुर येथे सेफ वॉटर नेटवर्क इंडिया व मेक इन गडचिरोली च्या वतीने नागरिकांकरिता शुद्ध पाणी पिण्याची सोय

 

 

चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे

चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर येथे सेफ वॉटर नेटवर्क चे वतीने मेक इन गडचिरोली चे पुढाकाराने गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत गौरीपुर येथील सुशिक्षित बेरोजगार युवक रंजन वैद्य या तरुणाने मनात गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याकरिता आमदार डॉ देवराव होळी यांच्या कडे खूप तळमळीने पाठपुरावा केला.आमदार डॉ देवराव होळी यांनी या मागणीची दखल घेतली व सदर विषय गांभीर्याने घेऊन सेफ वॉटर नेटवर्क इंडिया या संस्थेला कळवले व दोन तीन महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आज गौरीपूर येथे संपूर्ण अद्यावत पाण्याचे आय जल वाटर स्टेशन चे भव्य सयंत्र उभे करण्यात आले. आज या सयंत्राचे भव्य उद्घाटन आमदार डॉ देवराव होळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रकल्प संचालक रंजन वैद्य, सावित्री वैद्य ,भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , ज्येष्ठ नेते जयराम चलाख , सेफ वॉटर इंडिया नेटवर्क इंडिया पदाधिकारी विनोद वर्मा , जयेश पराडकर , हर्शविना मेश्राम , पंकज कावरे , रितेश साठवणे , व ग्रामपंचायत सदस्य तरुण गाईन , बेला मंडल , रिना गाईन ,नीतू विस्वास ,परिमल गाईन ,रवी गाईन व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here