नफरत की बाजार मे, मोहोबत की दुकान – डॉ. सतीश वारजुरकर

0
261

नफरत की बाजार मे, मोहोबत की दुकान – डॉ. सतीश वारजुरकर

जनसंवाद यात्रेचे खडसंगीत जोरदार स्वागत

तालुका प्रतिनिधी चिमूर


तालुक्यातील गोंदोडा येथून काँग्रेसची सुरू झालेली जनसंवाद पदयात्रा खडसंगी येथे दाखल झाली गावात अनेक नागरिक यांच्या संवाद साधत बस स्थानक परिसरात जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांच्या जनसंवाद यात्रेचे ” नफरात की बाजार मे, मोहोबत की दुकान” चे महत्व नागरिकांना जि. प. चे माझी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुरकर यांनी पटवून दिले.

या वेळी सभेला प्रदेश काग्रेसचे धनराज मुंगले, जी.प.माझी सदस्य गजानन बुटके,प्रा.राम राऊत,तालुका अध्यक्ष डा. विजय गावंडे,युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र चट्टे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सभेला संबोधित करताना डा. वारजुरकर यांनी सत्ताधारी भाजप प्रतिनिधी व कार्यकर्ते यांना लक्ष करताना अवैध कामचा आराखडा बोलला केंद्र व राज्य सरकारची दडपशाही,बेरोजगारी, महागाही स्थानिक आमदार यांच्या आशीर्वादाने त्यांचे कार्यकर्ते करतात ते अवैध धंदे या बाबत खुलासा केला.

या वेळी अनेक मान्यवर यांनी मार्गदर्शन केलं. त्यात त्यांनी सत्ताधारी भाजप च चुकीचं धोरण नागरिकांना पटवून दिलं.या सभेचं प्रास्ताविक युवक काँग्रेस चे नागेंद्र चट्टे,संचालन डा.विजय गावंडे तर आभार अविनाश अगडे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here