गडचिरोली वैनगंगा नदीवरील ट्राफिक बंद असतानाही जड वाहनांना प्रवेश, जनतेत असंतोष

0
803

गडचिरोली वैनगंगा नदीवरील ट्राफिक बंद असतानाही जड वाहनांना प्रवेश, जनतेत असंतोष

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाच्या डागडुजी साठी सदर पूल हर सकाळी 6 ते 10 पर्यंत संपूर्ण वाहनांसाठी आणि जड वाहनांसाठी संपूर्ण दिवस असे एक महिन्याच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पूर्वीच एसटी महामंडळ चा संप असल्याने जनतेला बाहेरगावी प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच चंद्रपूर मार्ग बंद झाल्याने चंद्रपूर कडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल नि हाल होत आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली कडे दररोज हजारो प्रवासी येतात जातात. खाजगी वाहने चांद्रपूरला जाण्यासाठी आता व्यहाड बूज च्या फाट्यावरून उपलब्ध होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी ऑटो, कार, दुचाक्या तर काही जनता पायीच जाऊन व्याहाड चा फाटा पुढल्या प्रवासासाठी गाठत आहेत. कुठलेही जड वाहन पुलावर प्रवेश करू नये याकरिता दूरवरच मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या दोन्ही बाजूला राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदारांची कर्मचारी तसेच गडचिरोली बाजूने ट्राफिक पोलिसांची पण ड्युटी लावण्यात आलि असल्याने मोठ्या वाहनांना काम सुरू असलेल्या पुलावरून प्रवेश मिळणे शक्यच नाही.

अश्यातच काही कर्मचारी मात्र आपल्या ओळखीतल्या तसेच त्यांची मर्जी सांभाळणाऱ्या जड वाहनांना मात्र पुलावरून प्रवेश देत असल्याचे निदर्शनात येत आहे. एकीकडे जनता प्रशासनाचा निर्णय मानून आपले छोटे मुल बाळ, सामान उचलून पूल पायपीट करत ओलांडत आहेत तर दुसरीकडे मात्र कर्मचारी जड वाहनांना प्रवेश देताना दिसत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत असून प्रवासी वाहनांना पुलाच्या तिकडेच थांबवून जनतेला त्रास देत मार्जितल्या जड वाहनांना सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here