भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून ट्रक चालक मालकांना कोळसा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरु

0
287

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून ट्रक चालक मालकांना कोळसा वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग सुरु

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व वेकोलि अधिकाऱ्यांनी केली पाहणी

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलि प्रबंधक अनंत ठाकरे, ट्रान्सपोर्ट युनियन घुग्घुसचे पदाधिकारी यांनी संयुक्तरित्या कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक होणाऱ्या जिओसी कोळसा खाण क्रमांक २ येथील बहिरमबाबा मंदिराच्या मागून बेलोरा पुलापर्यंत असलेल्या पर्यायी मार्गाची पाहणी केली.

सोमवार, ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजतापासून घुग्घुस-वणी-चंद्रपूर हा मार्ग जडवाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या राजीव रतन चौकात निर्माणाधीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. रहदारीला अडथळा निर्माण होवू नये म्हणून हा मार्ग प्रशासनाने बंद केला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वणीकडून घुग्घुस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा वरोरा-भद्रावती-ताडाळी-घुग्घुस मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे तसेच घुग्घुसकडून वणी जाण्यासाठी पडोली-भद्रावती-वरोरा मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

घुग्घुस परिसरात वेकोलि वणी क्षेत्राच्या नायगाव, निलजई, पैंनगंगा, मुंगोली अशा कोळसा खाणी आहे. घुग्घुस शहरातील अनेक ट्रक चालक-मालक यांच्या ट्रकांना कोळसा वाहतूक याच मार्गाने करावी लागते हा मार्ग बंद केल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार असल्याने ट्रान्सपोर्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व ट्रक चालक-मालकांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व समस्या सांगितली त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना याबाबत कळविले त्यांनी क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग यांच्याशी समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पर्यायी मार्ग सुरु करण्याचे आश्वासन दिले.

त्या अनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलि प्रबंधक अनंत ठाकरे व ट्रक चालक मालकांनी पर्यायी मार्गाची पाहणी केली आणि जडवाहतुकीसाठी मार्ग सुरु करण्यात आला.
मार्ग सुरु झाल्याने ट्रक चालक मालकांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here